tv show

लाहोर हाय कोर्टाचा आदेश फेटाळून पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानातील लोकल चॅनेल्स वर भारतीय टीव्ही शो आणि चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी आणली आहे. कराची स्थित सुप्रीम कोर्टात, United Producers Association यांच्याकडून याचिका सादर करण्यात आली होती. ही याचिका लोकल चॅनेल्स वर विदेशी कार्यक्रम दाखवण्यासबंधी होती. चीफ जस्टीस साकीब निसार यांनी या याचिकेवर निकाल दिला.

चीफ जस्टीस साकीब निसार यांनी निकालात म्हटले की, ” ते आपल्या संविधानाचे उल्लंघन करू इच्छित आहेत आणि आपण त्यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालू शकत नाही ! संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त योग्य कंटेंटच प्रसार केला पाहिजे.”

खरं तर पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथोरिटी यांनी 2016 मधेच लोकल चॅनेल्स वर भारतीय टीव्ही शो आणि FM वर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. इंडियन एंटरटेनमेंट इंडस्ट्री यांच्याकडून भारतात पाकिस्तानी टीव्ही शो आणि कार्यक्रम आणि कलाकारांवर बंदी घातली गेली होती. त्याचे सडेतोड उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने 2016 मध्ये यांवर बंदी घातली होती. लाहोर हाय कोर्टाने, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथोरिटी यांच्याकडून घातली गेलेली बंदी ही निरर्थक आणि बेकार आहे, त्यामुळे ही बंदी उठवण्याचे आदेश लाहोर हाय कोर्टाने दिले होते. लाहोर हाय कोर्टनुसार, केंद्र सरकारला या बंदी मुळे कसलीही आपत्ती नव्हती असे वाटत होते.

आपल्याला माहीतच आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्या काश्मीर मुद्द्यावरून नेहमीच तणावाचे वातावरण असते. पाकिस्तानी प्रधानमंत्री इम्रान खान यांनी म्हटले की भारत आणि पाकिस्तान याना बातचीत करून या समस्यांवर तोडगा काढावा लागेल. दक्षिण काश्मीर येथे झालेल्या चकमकीत 6 सामान्य नागरिक मारले गेल्यानंतर इम्रान खानने हे विधान केले होते. भारताने इम्रान खानचे विधान हे खूप खेदजनक आहे. त्यांनी आधी इस्लामाबाद येथे शरण घेतलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढून मारले पाहिजे. त्यांना शरण देऊन सर्वांना त्रास देण्यात काहीच हुशारी नाही. आधी ते काम पूर्ण करा आणि मग आंतरराष्ट्रीय समस्यांवर बोला, असं मत भारताचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here