प्रियंका चोपडा आणि निक जोन्स दोघे जण लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांचा विवाह सोहळा भारतातच पार पडला. भारतातील जोधपूर मधील उम्मेद पॅलेस मध्ये या दोघांचा विवाह सोहळा झाला. 1 डिसेंबर रोजी दोघे जण पती-पत्नीच्या नात्यात गुंतले. लग्न होताच पॅलेसच्या आवारात मोठी आतिषबाजी झाली. हे लग्न ख्रिश्चन धर्म पध्दतीने झाले आहे. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते दोघे परत एकदा लग्न करणार आहेत आणि ते हिंदू मान्यतेनुसार होणार आहे.

डिझाईनर राल्फ लॉरेन यांनी प्रियंका आणि निक यांच्या लग्नाची पुष्टी दिली. त्यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या. राल्फ लॉरेन Nickyanka च्या लग्नात उपस्थित राहणाऱ्या काही मेंम्बर पैकी एक होता. त्यामुळे तो स्वतः स्वतः सन्मानित वाटून घेत आहे.

दुसऱ्या ट्विट मध्ये राल्फ लॉरेन म्हणतो, ” प्रियंका आणि निक हे नवविवाहित जोडा पहिल्यांदा मेट गाला 2017 मध्ये राल्फ लॉरेन यांचे पाहुणे म्हणून स्पॉटलाईट मध्ये आले होते.” सूत्रांकडून कळतंय की, लग्न झाल्यानंतर उम्मेद भवन मध्ये कॉकटेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. लग्न समारंभ झाल्यानंतर जश्न म्हणून अशी पार्टी केली जाते.

या लग्नात प्रियंकाने राल्फ लॉरेन यांनी डिझाइन केलेला गाऊन घेतला होता. तसेच निकने राल्फ लॉरेन यांनी डिझाइन केलेला सूट घातला होता. मीडिया रिपोर्ट्स नुसार प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोपडा, निकचे भाऊ जो, केविन आणि फ्रॅंक हे सर्व ब्लॅक टक्स मध्ये दिसले तर नवरी आणि तिच्या सोबती ह्या साधारणतः फिकट गुलाबी रंगात दिसल्या.

निक आणि प्रियंकाने एकमेकांना अंगठी घातली. त्या अंगठीला जगातील सुप्रसिद्ध कारागीर Chopard यांनी डिझाइन केलं होतं. या ख्रिश्चन लग्नाला निकचे वडील पॉल केविन जोन्स यांनी ऑफिशिएट केलं. लग्नाआधी या दोघांनी उम्मेद भवनच्या लॉबी परिसरात फोटोशूट ही केला. त्यांच्या फॅन्स त्यांच्या लग्नाच्या फोटोंची वाट बघत आहेत.

यांच्या लग्नात भारतीय तसेच विदेशी लोक सहभागी झाले. या लग्नाला खाजगी ठेवलं गेलं. फक्त काही जवळचे फ्रेंड्स आणि नातेवाईक लग्नाला हजर होते. लग्नाचे फोटो लिक होऊ नये, म्हणून लग्नाच्या मेन्यू मध्ये मोबाईल फोन्सला बॅन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here