सध्या नेटफ्लिक्स वर एका पाठोपाठ येणाऱ्या सिरीज मुळे बहूचर्चित असलेली बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे, आज तिचा वाढदिवस आहे. आज राधिकाच्या जन्मदिनी आपण राधिका बद्दल काही निवडक गोष्टी जाणून घेणार आहोत. राधिका हि मूळची पुण्याची परंतु तिचा जन्म तामिळनाडू येथील वेल्लोर येथे झाला. राधिका हि पुण्याचे सह्याद्री हॉस्पिटल चे चेअरमन डॉ. चारुदत्त आपटे यांची मुलगी आहे. राधिका ने आपले शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून पूर्ण केले आहे, तिने सुरुवातीच्या काळात ‘कथक’ हा डान्स फॉर्म अवगत केला होता तो तिने तब्ब्ल ८ वर्षासाठी पुढे सुरु ठेवला. पुढे राधिका ने २०१३ मध्ये Benedict Taylor या व्हायोलिन कलाकाराशी लग्न केले.

राधिका च्या ऍक्टिंग करियर ची सुरुवात हि २००५ मध्ये ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटामधून झाली. या सिनेमा मध्ये राधिकास काही खास असा रोल मिळालेला नाही परंतु त्यानंतर राधिका ने अशा बरीच सिनेमांमध्ये काम केले व हळूहळू बॉलिवूड इंडस्ट्री मधील आपला ग्रेड वाढवला. नेटफ्लिक्स वर सध्या राधिका ने आपल्या एका पाठोपाठ सिरीज ने सर्वत्र आपलेच वर्चस्व गाजवले आहे. तिने सॅकर्ड गेम्स, घुल, लस्ट स्टोरीज, या सारख्या सिरीज मध्ये राधिका ने आपली उत्तम कामगिरी दाखवली आहे.

राधिकाने तिच्या संपूर्ण या प्रवासादरम्यान अनेक अडचणींना तोंड दिले आहे. बॉलिवूड मध्ये कित्येक अडचणी असतात परंतु त्या सर्वांना खंबीरपणे सामोरे जात राधिका ने आज आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. आज राधिका च्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजणच तिला ट्विटर द्वारे शुभेच्छा देत आहेत. त्यात बॉलिवूड कलाकार, तिचे फॅन्स या सर्वांचाच समावेश आहे. आज नेटफ्लिक्स सारख्या मेडिया वर एका पाठोपाठ ३ सिरीज देणारी राधिका हि एकमेव अभिनेत्री आहे जिने आपल्या कलेच्या आधारे प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या तर्फे राधिकास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या पुढील वाटचालीस सुद्धा शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here