Rajinikanth

रजनीकांतची ओळख करून द्यायला, त्याचं फक्त नावच खूप आहे. सुपरस्टार रजनी नावाने संपूर्ण भारतात तसेच जगभरातील अनेक मोठमोठ्या देशात तो प्रसिद्ध आहे. रजनीकांतचे फॅन्स त्यांची पूजा करतात. रजनीकांतच्या जीवन जगण्याची फिलॉसॉफी सोपी आहे, ‘ साधे राहणीमान, उच्च विचार ‘. त्यांच्या समाजकल्याणकारी कामामुळे ते लोकांत ओळखीचे आहेत. त्यांच्या आशा राहणीमानामुळेच तर लोकांनी त्यांना ऍक्टर म्हणून नव्हे तर देव म्हणून मंदिरात जागा दिली आहे. त्यांना एका महिलेने भिकारी समजले होते, या घटनेची तथ्यथा आम्ही तपासली आहे. ही खरी घटना आहे.

रजनीकांतचे आत्मचरित्र ‘ The Name is Rajanikanth ‘ यामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. ही घटना 2007 मधली आहे, जेंव्हा रजनीकांत आपली ब्लॉकबुस्टर चित्रपट ‘Shivaji- The Boss’ साठी काम करत होता. या चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर विदेशातही मोठी कमाई केली होती. त्यामुळे रजनीकांत मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातात.

या पुस्तकात या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. या पुस्तकात विस्ताराने हे प्रकरण मांडण्यात आले आहे. त्या मंदिरात खूपच गर्दी होती, चेंगराचेंगरी होतं होती. रजनीकांतने त्यावेळी आपलं जमिनीशी नात दाखवलं. आपण एवढे मोठे स्टार आहोत, या गोष्टीचा कसलाही गर्व न बाळगता, त्यांनी वेषांतर करून दर्शन घेण्याच ठरवलं. त्यांनी एका भिकाऱ्याच वेष धारण केलं. रजनीकांतने एक जुना टि-शर्ट आणि लुंगी आणि जाड शॉल अंगाभोवती लपेटली होती.

वेषांतर करून जेंव्हा रजनीकांत मंदिरात पोहचले तेंव्हा त्यांना कोणीच ओळखले नाही. एका म्हाताऱ्या माणसाप्रमाणे ते दिसत होते. त्यांच्या वेशाकडे बघून एका गुजराती महिलेला दया आली, त्यांनी रजनीकांतला 10 रुपयांची नोट दिली. जो ऍक्टर करोडो कमावतो त्याला ती महिला 10 रुपये देत होती, पण रजनीकांत काही क्षण स्तब्ध झाले आणि नम्रतेने त्या महिलेने देऊ केलेले दहा रुपये त्यांनी घेतले.

पुढे त्याच महिलेने पाहिले की, ” ज्याला ती एक भिकारी समजत होती, तो तर मंदिराच्या हुंडीत शेकडो रुपये टाकत आहे, आणि गरिबांना 100 रुपये देऊ करत होता. तो एका पॉश कार मध्ये जात होता. रजनीकांत कार पर्यंत पोहचणार तेवढ्यात त्या महिलेने त्यांना अडवले. तिने रजनीकांतची माफी मागितली. तिने ते पैसे परतही मागितले. पण त्यावर रजनीकांत म्हणाला, ” प्रत्येक वेळी मला मी कोण आहे, हे समजण्याचा मार्ग मिळतो, मी कोणी मोठा व्यक्ती नाही, मी दुसरा-तिसरा कोणी नसून एकप्रकारे भिकारी तर आहे ” म्हणून त्याने त्या महिलेला समजावून सांगितले.

त्या सुपरस्टारने ते 10 रुपये आपल्या खिशात ठेवत ती जागा सोडली. जेंव्हा मानवतेच्या दृष्टीने पाहाल तर तुम्हाला रजनीकांतचा मोठेपणा दिसून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here