सलमान या वेळी सहाव्या वेळेस हा शो होस्ट करणार आहे, आणि प्रत्येक वेळी सारखेच या वेळेस देखील सलमान आपले चार्जेस वाढवणार हे मात्र नक्की आहे. यावेळेस बिग बॉस १२ साठी सलमान खान हा एका एपिसोडसाठी अंदाजित रक्कम १४ करोड एवढी रक्कम आकारणार आहे. २०१७ मधील काही बातम्या नुसार सलमान ने सुरुवातीच्या काळात  बिग बॉस-4 ते बिग बॉस-6 या शो साठी २.५ करोड प्रत्येकी एपिसोड अशी फी आकारली होती, त्यानंतर  बिग बॉस-7 साठी त्याने अचानक आपली फी त्याच्या दुप्पट केली म्हणजेच ५ करोड प्रत्येकी एपिसोड. या सीजन नंतर त्याच्या चार्जेस मध्ये अशीच वाढ होत गेली आणि त्यापुढे त्याच्याकडून बिग बॉस-8, बिग बॉस-9, बिग बॉस-10 आणि बिग बॉस-11 यासाठी अनुक्रमे ५.५ करोड, ७ ते ८ करोड, ८ करोड आणि ११ करोड अशी रक्कम आकारण्यात आली.

वरील आकडेवारीनुसार यावेळेस सुद्धा सलमान बिग बॉस मधील एकूण कमाई मध्ये आपला मागच्या वर्षीचा रेकॉर्ड यावर्षीसुद्धा स्वतःच तोडणार आहे. मागच्या वर्षी सलमान ने बिग बॉस-11 मध्ये अंदाजे २६४ करोड इतकी एकूण कमाई केली होती, आणि यावर्षी त्यापेक्षा जास्त होणार हे नक्की आहे.

आमचे अपडेट वर WhatsApp मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp जॉईन करायला विसरू नका.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here