सलमान खानने बिग बॉस 12 मधील 26 व्या एपिसोड मध्ये सहभागींना खडे बोल ऐकवले आहेत.

शिवाशिष हा बिग बॉस 12 मधील एक सहभागी असून त्याने दीपक या सहभागी सदस्यास मारण्यासाठी प्लॅन केला होता. या सर्व गोष्टी सलमानला समजल्यानंतर सलमानने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला, तो जो काही वागला होता ते चुकीचे होते. परंतु सलमान समजावीत असताना सुद्धा शिवाशिष आपल्या निर्णयावर ठाम होता. जोपर्यंत सलमान खान जास्त रागात येत नाही तोपर्यंत शिवशीष मी कसा बरोबर आहे, याचंच स्पष्टीकरण देत होता. नंतर सलमान खानने दोघांनाही रागावून सांगितले, आणि शेवटी दोघांनीही एकमेकांची माफी मागून हा इशू बंद केला.

शारीरिक हल्ला करण्याच्या विषयावर बोलत असताना सलमान खानने ‘श्रीष्टी रोडे’ आणि ‘सबा खान’ यांच्याकडे पॉइंट आऊट करत, या दोघींच्या ‘कॅप्टन्सी टास्क’ मधील त्यांच्या भांडणाची आठवण करून दिली. त्या दोघींना अशी घटना नंतर होऊ नये म्हणून सक्त ताकीद केली आहे. त्यानंतर श्रीष्टी रोडे आणि सबा खानने यांनी देखील एकमेकींना माफी मागितली आणि या इशुचा शेवट झाला.

सलमान खान ज्यावेळी या सर्व ताकीद देत होता तेंव्हा या शो मधील वातावरण खूप गरम झाले होते. सलमान खानने शारीरिक हल्ला करणाऱ्यांना शेवटची ताकीद दिली आहे. याबाबतीत बोलत असताना सलमान म्हणाला कि, ” मी ज्या शो चा होस्ट होऊ इच्छितो तो हा शो नाहीये. माझ्या शो मध्ये शारीरिक हल्ल्याचे प्रकार होणार असतील तर मी असा शो कधीच करणार नाही.” असे सलमानने सर्वांना धमकावले आणि शो सोडण्याची ताकीद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here