बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हे सध्या ‘बिग बॉस’ मुळे चर्चेत तर आहेतच. सलमान लवकरच एका वेब सिरीज मध्ये काम करणार असल्याच्या कारणावरून ते जास्तच चर्चेत आहे. सध्या सलमान खान बिग बॉस च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर त्यांचा आगामी चित्रपट ‘भारत‘ च्या शूटिंग साठी त्यांचं वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.

‘विशाल भारद्वाज’ हे प्रोड्युसर सलमानला घेऊन एक वेब सीरिज काढणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यासाठी नेटफ्लिक्स सोबत विशाल भारद्वाजन हातमिळवणीही केली आहे. विशाल भारद्वाज हे नेहमी कादंबरी आधारित फिल्म काढतात. त्यांची ही वेब सिरीज सुद्धा अशीच एका कादंबरीवर आधारित आहे. ती कादंबरी सलमान रश्दी यांची ‘मिडनाईट्स चिल्ड्रन‘ ही आहे. सलमान सुद्धा यासाठी तयार असून लोकांसाठी फॅमिली एंटरटेनमेंट तयार करणं हे माझं ध्येय आहे, असे सलमान म्हणाले.

विशाल भारद्वाज यांचा ‘पटाखा’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. त्यांनी या अगोदर ‘ओमकारा’, ‘हैदर’ आणि मकबूल अशी अनेक फिल्म्स काढली आहेत. आता ते सलमान खान सोबत सलमान रश्दी यांच्या ‘मिडनाईट्स चिल्ड्रन‘ या कादंबरीवर वेब सिरीज काढत आहेत. या दिगग्ज कलाकार आणि प्रोड्युसर मुळे प्रेक्षक या वेबसिरीजची आतुरतेने वाट पाहणार हे मात्र नक्की.