The Kapil Sharma Show
सलमान खानने आतापर्यंत अनेक कलाकारांना बॉलीवूड मध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी मदत केली आहे. त्यात बॉबी देओल, कॅटरिना कैफ आणि आता कपिल शर्माचा नंबर लागतोय. यांच्या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत ज्यांचे सलमान खान कडून या इंडस्ट्री मध्ये करिअर रिवाईज केलं गेलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्माचा पुढच्या वर्षी येणारा ‘दि कपिल शर्मा शो‘ हा सलमान खान प्रोड्युस करणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
कपिल शर्माचा ‘ दि कपिल शर्मा शो’ चे या अगोदर दोन सिजन झाले आहेत. ते दोन्ही सिजन वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊस ने प्रोड्युस केले होते. पहिला सिजन K9 प्रोडक्शन हाऊसने प्रोड्युस केले होते तर दुसरा सिजन फ्रेम्स प्रोडक्शन हाऊस ने प्रोड्युस केले होते. तिसरा सिजन प्रोड्युस करण्याच काम सलमान खानने घेतलं असल्याचं म्हटलं जातं आहे. फ्रेम्स प्रोडक्शन हाऊस ने गेल्या सिजन मध्ये झालेल्या घटने मुळे कपिल शर्मा सोबत काम करण्यास नकार दिला आहे. कपिल शर्मा आणि प्रोड्युसर यांच्यातील नातं गेल्या वेळेस च्या काही घटनेमुळे आणि कपिल शर्माच्या अनप्रोफेशनल बिहेवीअरमुळे खूप खराब झाले आहे.
दुसरीकडे कपिल शर्माकडे एवढे पैसे नाहीत की ते स्वतः शो प्रोड्युस करू शकतील. त्यांनी अनेकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही ते तयार करू शकले नाहीत. शेवटी कपिल शर्माच्या ‘दि कपिल शर्मा शो’ची कमान सलमान खानने सांभाळली.
या शो चा येणारा सिजन सलमान खानच्या बॅनर खाली प्रोड्युस केला जाईल.
चॅनलला अगोदरचीच स्टारकास्ट हवी होती परंतु सारखी स्टार कास्ट करण्यासाठी खूप कठीनाई येत आहे. चॅनेलने सर्व ऍक्टर्स उपासना सिंह, चंदन प्रभाकर, अली असगर, सुगंधा मिश्रा आणि रोशेल राव यांना अप्रोच केलं होतं पण कोणाकडूनही पॉजिटिव्ह प्रतिसाद आला नाही. परंतु तिथेच दुसरीकडे कीकू शारदा, भारती सिंह आणि सुमोना चक्रवर्ती यांनी काम करण्यास पॉजिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे.
हा नवीन ‘दि काही शर्मा शो’ पुढच्या वर्षी लाँच होईल. चॅनेल ने हा शो पोस्टपोंड केला आहे. त्यांना वाटतंय की शो पूर्वी सर्व काही परफेक्ट असावं. चॅनेल कसल्याही प्रकारची घाई गडबडी करणार नाही. अजून खूप काम राहील आहे, कास्टिंग पासून फॉर्मेट पर्यंत सर्व काम बाकी आहे. त्यामुळे लवकर हा शो फ्लोर वर येणं शक्य नाही. हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला आहे.
चॅनेल आणि कपिल दोघेही सुनील ग्रोव्हर ला शो मध्ये वापस आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कपिल शर्मा सुनील ग्रोव्हरशी दोस्ती करू इकच्छीत आहेत, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तिकडे सुनील काम करण्यास तयार नाहीत, परंतु चॅनेल ने अजून हिम्मत हरली नाही. ते सुनील ला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील म्हणतायत की, ” सध्या ते चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्थ आहेत. त्यामुळे कपिल शर्मा सोबत काम करण्याचा अजून तरी मी कसलाही विचार केला नाही.”
परंतु सलमान खान ‘दि कपिल शर्मा शो’ ला प्रोड्युस करणार म्हटल्यामुळे हा सिजन थ्री सर्वांसाठी विशेष असणार आहे. आगामी येणाऱ्या या शोला सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा.