बॉलीवूड चा दबंग अभिनेता सलमान खान गुरुवारी आपल्या एका चार्टर्ड विमानाने दिब्रूगड येथील मोहनबडी विमानतळावर उतरले. विमानतळावर सलमान खानचे आगमन होत आहे हे कळताच स्थानीय लोक हर्षोल्हासित झाले. सलमान खानचे विमानतळावर स्थानीय लोकांकडून भव्य स्वागत करण्यात आले. तेथील लोकांचे सलमान खान प्रति प्रेम बघून सलमान खानही भारावला.

ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे की एवढा मोठा कलाकार अरुणाचल प्रदेश सारख्या दूरच्या ठिकाणी एखादा फेस्टिव्हल सेलिब्रेट करण्यासाठी जातो. सलमान अरुणाचल प्रदेश मधल्या मेचुका येथे मेचुका फेस्टिव्हल सेलिब्रेट करण्यासाठी मोहनबडी येथे गेला. मोहनबडी पासून मेचुका कडे जाण्यासाठी सलमान खानने हेलिकॉप्टरचा वापर केला. मोहनबडी पासून पुढचा प्रवास हेलिकॉप्टर मधून केला गेला आणि मगच मेचुका येथे पोहचल गेलं.

मेचुका फेस्टिवल अरुणाचल प्रदेशात साजरा केला जातो. आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लोकांना पर्यटनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा फेस्टिवल साजरा केला जातो. हा फेस्टिवल केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि राज्य पर्यटन मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि Centre For Cultural Research and Documentation या पार्टनर च्या साहाय्याने ऑर्गनाईझ केला जातो.

हे शहर Siyom नदी किनारी वसलेलं आहे. मॅक मोहन लाईन पासून अगदी 30 किमी वर असलेल्या या दरीतील ठिकाणाला स्थानीय लोक मेचुखा असेही संबोधतात. केंद्रीय मंत्री राज वर्धनसिंह राठोड आणि केंद्रीय मंत्री किरण रिज्जीजू हे दोघे अरुणाचल प्रदेश मधील कमेंग जिल्ह्यातील आहेत. तसेच या फेस्टिवलला त्यांनी भरभरून साथ दिली आहे, आणि यासाठी उपस्थित राहिलेला सलमान खाननेही खूप सपोर्ट केला आहे. सलमान खान सध्या त्याच्या ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here