सोमवारी सलमान खान टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपल्या एका लहानशा फॅनला भेटायला पोहचला. एका छोट्याशा रिक्वेस्ट वर तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहचला. सलमान खानचा हा दयाळूपणा बघून लोकांना ही त्याचा हेवा वाटायला लागलाय. त्या कॅन्सर पीडित छोट्याशा फॅनला भेटल्यावर सलमान त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सलमान खानला एका गोविंद नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा नेफ्यु खूपच आजारी आहे आणि त्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं. तो टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचंही सांगितल. याच्या एका रिक्वेस्ट वर सलमान खान त्या लहान बाळाला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्यालाच काय हॉस्पिटलमधल्या अन्य सर्व लहान कॅन्सर पीडितांना भेटला. तो गरजूंन ते मागितले नाही तरी, तो मदत करतो. सलमान खानची ही दर्यादिली फक्त त्याच्या फॅन्स साठीचं नाही तर सर्वांसाठी आहे.

2010 मध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधल्या डॉ हंसराज हाथीला म्हणजेच कवी कुमार आझादला ही मदत केली होती. सध्या ते अनंतात विलीन झाले आहेत. त्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी बैरियाट्रिक सर्जरी केली होती. त्यावेळी त्यांची फायनांशीअल कंडिशन खूप खराब होती. ही गोष्ट जेंव्हा सलमान खानला कळली, तेंव्हा त्यांच्या हॉस्पिटलचं बिल सलमान खानने भरलं होतं. ऑपरेशन झाल्यावर कवी कुमार आझाद यांनी सलमान खानला धन्यवाद ही म्हटलं होतं.

सलमान खान सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. त्या चित्रपटाचं नाव आहे, ‘भारत‘. या चित्रपटात सलमान खान बरोबर कॅटरिना कैफ आणि दिशा पटांनी ही दिसणार आहेत. या चित्रपटाचं डायरेकशन अली अब्बास करत आहेत. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here