चित्रिकरणाला अवघे १० दिवस बाकी असताना प्रियांकानं ‘भारत’ सिनेमाला सोडचिठ्ठी देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ‘भारत’साठी प्रियांकानं सर्वाधिक मानधन आकारल्याचं म्हटलं जात होतं. प्रियांकानं बिग बजेट सिनेमाला ऐनवेळी नकार दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. नंतर या नकाराची अनेक कारणं समोर आली त्यातलं प्रमुख कारण होतं तिच्या वाट्याला आलेला हॉलिवूड चित्रपट.

प्रियांकाच्या या ऐनवेळी माघार घेण्याच्या निर्णयावर अखेर सलमाननं मौन सोडलं आहे. ‘मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. तिनं हॉलिवूड चित्रपटाला होकार दिला आहे याची पूर्वकल्पना आम्हाला होती, त्यामुळे आम्ही तिला रोखू शकलो नाही. चित्रिकरणाला दहा दिवस बाकी असताना तिनं चित्रपट सोडण्याचा निर्णय आम्हाला कळवला. तिच्याकडे दोनच पर्याय होते एकतर माझ्यासोबत काम करणं किंवा हॉलिवूड चित्रपट करणं आणि तिनं दुसरा पर्याय स्विकारला’ असं सलमान म्हणाला.

खरं तर प्रियांकानं हा बिग बजेट चित्रपट नाकारला म्हणून सलमानही नाराज होता तसेच तिच्यासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय त्यानं घेतला. मात्र सलमाननं तिच्या निर्णयाचं कौतुक करत आपल्या परिनं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.