सध्या #MeToo मोहिमेच्या अंतर्गत अनेक महिला सामोरे येऊन आपल्या सोबत झालेल्या अन्यायाचा वाचा फोडत आहेत. या चळवळीमध्ये आलोक नाथ, नाना पाटेकर, कैलास खेर आणि रजत कुमार यासारख्या कलाकारांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.

घटना घडून इतक्या वर्षानंतर या घटना वर येत आहेत आणि त्यात काय खरे आहे आणि काय खोटे, हे स्पष्ठ करणे थोडेसे अवघड जात आहे. या #MeToo मोहिमेबद्दल बोलताना अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी आपले मत मांडले आहे. शिल्पा शिंदे ज्यांनी ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमध्ये काम केले होते. त्यानंतर मागील वर्षी त्यांनी मालिकेचे निर्माते ‘संजय कोहली’ यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

#MeToo बद्दल बोलताना शिल्पा शिंदे म्हणाल्या कि, “हा सर्व मूर्खपणा आहे, जेंव्हा घटना घडली तेंव्हाच तक्रार करायला हवी होती. घटना घडून गेल्यावर बोलून काहीच उपयोग नाही, याची फक्त चर्चा होईल. आता या मोहिमेमधून सर्वजण आपल्या घटना सांगत आहेत, परंतु माझ्या वेळेला कोणीही माझी साथ दिली नाही. तेंव्हा माझी लढाई मी एकटीने लढली आहे.”

बॉलिवूड इंडस्ट्री बद्दल बोलताना शिल्पा म्हणाली कि, ‘सर्व पीडित आता पुढाकार घेत आहेत परंतु बॉलिवूड मध्ये कधीही रेप झालेले नाहीत, येथे जे काही होते ते परस्पर संमतीने होत असते. जर ते तुम्हाला मान्य नसेल तर विषय सोडून द्यावा आणि घटना घडून झाल्यावर आरोप करून उपयोग नाही.’

बिग बॉस सीजन 11 च्या विजेत्या शिल्पा शिंदे यांनी या मोहिमेबद्दल आपले मत मांडले आहे. तनुश्री दत्त यांनी नाना पाटेकर वर केलेल्या आरोपानंतर हा विषय जास्त चर्चेत येऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here