बॉलीवूड मधील हिंदी चित्रपट ‘ सिम्बा ‘ वर्षाच्या शेवटी मसाला हिट ठरत असलेला दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे. या दोन सुपरस्टारचा हा चित्रपट 28 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या रिस्पॉन्स वरून असं दिसून येत आहे की 2018 मधील हा चित्रपट शेवटचा सुपर हिट चित्रपट होईल.

चित्रपटाचे प्रदर्शक अक्षय राठी हे मानतात की चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई ही 25 कोटी पेक्षा जास्त होईल. अक्षय राठी याने अशी अपेक्षा ही आहे की या चित्रपटाची कमाई पहिल्या 3 – 4 दिवसात 100 कोतो रुपयांचा अकडा गाठेल. अक्षय पुढे म्हणतात, ” सिम्बा खऱ्या अर्थाने एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार आहे. कारण चित्रपटाच्या कास्टिंग पासून तर चित्रपटाच्या डायरेक्टर, ऍक्टर, म्युझिक, गाणे हे सर्व काही चित्रपटाच्या फेवर मध्ये आहे. हा चित्रपट निश्चितपणे बॉक्सऑफिस मध्ये कमाल करून दाखवेल याची मला खात्री आहे.

तुम्हाला माहीत असेल या वर्षाच्या सुरुवातीला रणवीर सिंगचा पद्मावत हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याने बॉक्सऑफिस मध्ये धमाल केली होती. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांनी पद्मावत मध्ये काम केलं होतं. वर्षाच्या सुरुवातीला दिलेला हा रणवीर सिंग चा सुपरहिट चित्रपट होता आणि आता वर्षाच्या शेवटी दिलेला सिम्बा हा रणवीर सिंगचाच सुपरहिट चित्रपट असेल असा विश्वास अक्षय राठी यांनी दिला आहे. पद्मावत चित्रपटाचे डोमेस्टिक कलेक्शन हे 300 कोटी पेक्षा जास्त झाले होते.

सिम्बा चित्रपटाला रोहित शेट्टी यांनी डायरेक्ट केलं आहे. रणवीर सिंग सोबत इंदूस्ट्री मधील नवीन कलाकार सारा अली खान दिसत आहे. या चित्रपटात सोनू सूद तसेच आशुतोष राणा यांचा ही महत्वाचा रोल आहे. यांची कामगिरी ही खूप उत्तम आहे.