आत्मविश्वास असेल तर माणूस कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे सोनाली बेंद्रे, तिने फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने आपल्या रिसेंट पोस्टमधून सगळ्यांना दाखवून दिले आहे.

सध्या सोनाली हाय ग्रेड कॅन्सरशी लढा देत न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या पोस्टमध्ये तिने दोन मैत्रिणींसोबतचा फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये सुझान खान आणि गायत्री आबेरॉय असून हा फोटो ऋतिक रोशनने काढला आहे. सोनाली लिहिते “मी या जीवघेण्या वेदनेतही मला जे आवडते तेच मी करते, ज्यांच्यावर प्रेम करते; त्यांच्यासोबत वेळ घालवते. बिझी शेड्युलमधून मला वेळ देणाऱ्या माझ्या मित्रांबद्दल मला फार आपुलकी आणि अभिमान वाटतो. मी एकटी नाही याची मला सतत जाणीव करून देत मला वेळोवेळी फोन कॉल्स करून आपुलकीने माझी विचारपूस करतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल आभाऱ़”.

अत्यंत त्रासात असूनही सोनाली चेहऱ्यावर हास्य ठेवून सगळ्या गोष्टींना सामोरे जात हा प्रेरणादायी संदेश देत आहे.