साऊथचा सुपरस्टार जुनिअर NTR यांचे वडील व आंध्र प्रदेश चे माजी मुख्यमंत्री ‘NT रामराव’ यांचा मुलगा नंदामुरी हरीक्रिशन यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. नंदामुरी हरिकृष्ण हे एक चांगला अभिनेता व तसेच एक उत्तम राजनेता म्हणून प्रसिद्ध होते.

बुधवारी सकाळी त्यांच्या गाडीची दुभाजकावर धडक होऊन भीषण अपघात झाला, त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, ते ६१ वर्षांचे होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ते आंध्रप्रदेश येथील नेल्लुर ला दुपारी लग्नास उपस्थित होणार होते, परंतु त्यांच्यावर काळाने घात घातला. बाजूच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना ड्राइवर चा गाडीवरून ताबा सुटल्याने गाडी जाऊन दुभाजकावर धडकली.

त्यांच्या पाश्च्यात त्यांची मुले, जुनिअर NTR आणि कल्याण राव, त्यांची पत्नी, सुहासिनी असा त्यांचा परिवार आहे. नंदामुरी बरोबरच त्यांची दोन्ही मुलेही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या जाण्याने अभिनय व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होते आहे. ते राजकीय क्षेत्रात एक चांगला नेता म्हणून प्रसिद्ध होते त्याचबरोबर दाक्षिण्यात सिनेमात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत.

त्यातच दुर्देवी योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा हा अपघात झाला तिथूनच थोड्या अंतरावर त्यांच्या मोठ्या भावाचा सुद्धा  २०१४ साली अपघाती मृत्यू झाला होता.

हा रस्ता या परिवारासाठी दुर्दैवीच ठरला आहे, नंदामुरी हरीक्रिशन यांच्या आत्म्यास शांती लाभो.