तारक मेहता का उलटा चष्मा‘ मधील जेठालाल ने गडा इलेक्ट्रॉनिक्स ही दुकान विकून टाकण्यासाठी जाहिरात केली आहे. दुकान विकून वापस गुजरात मध्ये जाऊ इच्छितात जेठालाल. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील सर्वात लोकप्रिय किरदार जेठालाल गडा यांनी आपली गडा इलेक्ट्रॉनिक्स ही दुकान विकून टाकली असल्याची बातमी येत आहे. जेठालालच्या या निर्णयामुळे गोकुलधाम सोसायटी मध्ये हाहाकार माजला आहे. सर्व जण गोंधळून गेले आहेत. कोणालाच या गोष्टीवर विश्वास बसत नाही. येत्या एपिसोड मध्ये जेठालालने दुकान विकल्याची गोष्ट दाखवण्यात येईल.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ च्या या नव्या गोष्टीची सुरुवात तेंव्हा होते, जेंव्हा एक व्यापारी जेठालाल च्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात येतो आणि तो त्याच्या बिझनेस बद्दल जेठालाल ला माहिती सांगतो तसेच त्याने आपले दुकान व्यवस्थित चालत नसल्याने विकन्याचा विचार ही करत असल्याचं सांगत आहे. तो येऊन गेल्यानंतर जेठालाल पण आपल्या व्यापार बद्दल विचार करतो. त्याला वाटते की आपल्या दुकानात सुद्धा सध्या फक्त काही छोट्या छोट्या गोष्टीच विकल्या जात आहेत. या गोष्टींमुळे जेठालाल ला राग येतो. आणि जसा जसा दिवस ढळत असतो, तसं तसं त्याचं फ्रस्ट्रेशन वाढत जात.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये पुढच्या एपिसोड मध्ये भिडे वर्तमानपत्र वाचत असतो. तेवढ्यात त्याला त्या पेपर मध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्स विकत असल्याची जाहिरात दिसली. भिडे भांबावून जातो, त्याला काही सुचत नाही, विश्वास बसत नाही. तो लगेच आपली पत्नी माधवी ला घेऊन तारक मेहता यांच्या घरी जातो आणि त्यांना ही सर्व कहाणी सांगतो. तेवढ्यात हळू हळू ही बातमी सर्व गोकुलधाम मध्ये पोहचलेली असते आणि सर्व जण तारक मेहता च्या घरी एकत्र येतात. इकडे हे सर्व जण जमले असताना तिकडे जेठालाल आपल्या त्रासाबद्दल बापूजी सोबत बोलत असतो, तो बापूजी ला म्हणतो की त्याला वाटते दुकान विकून वापस गुजरातला जावे आणि तेथेच राहावे. बापूजी त्याला समजावतात आणि म्हणतात सर्व काही ठीक होऊन जाईल. सर्व जण जेठालाल ला मेहता च्या घरी बोलावतात. पण कोणी बोलण्याच्या आधीच बापूजी त्याला सोसायटी कंपाउंड मध्ये बोलावतात. सर्व एकामागे एक सोसायटी कंपाउंड मध्ये जमा होतात. ती जाहिरात बघून जेठालाल ही आश्चर्यचकित होतो.

जेठालाल पुढे काय करेल ? तो खरच दुकान विकून टाकेल का ? ती जाहिरात जेठालालला न विचारता कोणी टाकली ? आशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यासाठी बघत रहा आणि हसत रहा ‘तारक मेहता का उलटा चष्मा’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here