कॉमेडीचा किंग कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर परतनार आहे, स्वतः कपिल शर्माने हि बातमी दिली आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्यांनी सुखद धक्का दिला आहे. कपिल शर्मा गेल्या काही दिवसापासून प्रकाशझोतांपासून दूर होता आता तो परत आपले पुनरागमन करणार आहे. त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा शो म्हणजे ‘ द कपिल शर्मा शो’, आता त्याच शोचा नवीन सिझन घेऊन कपिल परतनार आहे.

गेल्या काही महिन्यापासून कपिल शर्मा हा लाइमलाईट पासून दूर होता, त्यात त्याने पुनरागमन केले होते परंतु त्यात तो चाहत्यांना खुश करण्यात अपयशी ठरला त्यामुळे त्याला आपला शो बंद करावा लागला. त्याचबरोबर त्याचे सहकलाकारा बरोबर झालेले वाद, पत्रकारांनशी केलेली शिवीगाळ व तसेच त्याच्या प्रेयसी बरोबर झालेला वाद या सर्व गोष्टीमुळे कपिल शर्मा हा चंदेरी दुनियेपासून दूर गेला होता.

परंतु एवढे झाले असले तरी त्याचे चाहते त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्यामुळे कपिल ने आपल्या चाहत्यांच्या आग्रहाखातीर पुनरागमन करण्याचे ठरवले आहे. ‘कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरु करण्याबाबतची कल्पना असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना स्पष्ट केले. सध्या या शो चे काम पहिल्या टप्प्यावर सुरू असल्याचे कपिल शर्मा ने सांगितले.

पण त्याअगोदर कपिल हा चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून आपले नशीब अजमावणार आहे. होय तो ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाची निर्मिती कपिल शर्मा ने केली आहे. त्याचा हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु सर्वांचे लक्ष आता त्याच्या छोट्या पडद्याच्या पुनरागमनावर लागले आहे.