Thugs Of Hindostan’s First Poster Released

आपणास सर्वांना माहीती आहे की, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा ‘थग्स ऑफ हिंदुस्तान‘ हा चित्रपट लवकरच येणार आहे. बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच काम चालू होतं. या चित्रपटात आमिर खान, कतरिना कैफ, फातिमा आणि अमिताभ बच्चन हे मुख्य कलाकार म्हणून आपल्याला दिसणार आहेत.

विजय कृष्ण आचार्य यांच्या निर्देशनात तयार होत असलेल्या या चित्रपटात वरील चार कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आले, त्यात या चारही कलाकारांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. या चित्रपटाचे निर्माता आदित्य चोपडा या चित्रपटाच्या गुप्ततेसंबंधी संपूर्ण प्रयत्न करीत आहेत.

याच्या अगोदर या चारही कलाकारांचं वैयक्तिक पोस्टर सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आले होते. त्यातील अमिताभ बच्चन यांचं लूक प्रेक्षकांना मोहून टाकणारं आहे. अमिताभ बच्चन याना या वेशभूषेत पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता खूप वाढली आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबर ऐवजी 8 नोव्हेंबर रोजी रिलीज होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कतरिना कैफ ही या चित्रपटात सुरैया नावाच्या पात्रात दिसेल आणि फातिमा सना शेख ही एक योद्धा असून तिचे नाव जाफरा आहे. परवाच आमिर खानच्या पात्राचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, त्यात आमिर खान फिरंग्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचं ट्रेलर हे 27 सप्टेंबर रोजी रिलीज केलं जाईल, कारण त्या दिवशी यश चोपडा यांचा जन्मदिवस आहे. आमिर खान हा या चित्रपटात समुद्री लुटेरांच्या भावी पिढीचा निर्वाहकर्ता आहे आणि अमिताभ बच्चन हे सुद्धा जेष्ठ समुद्री लुटेरे आहेत. बॉलीवूड मध्ये आशा प्रकारचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे हा चित्रपट खूप चालणार अशी सर्वांकडून अपेक्षा आहे.

काल यश राज फिल्म्स यांच्या मार्फत ट्विटर वरून पोस्टर रिलीज करण्यात आले.