बॉलिवूड मधील ऍक्टिव हिरो टायगर श्रॉफने यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मध्ये आणखी एक नवीन नियम जोडला आहे. नवीन नियमानुसार तो यापुढे इंटिमेट सिन जसे कि, किसिंग किंवा बोल्ड सिन करणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलंय.

आपणास सर्वांना माहीत असेल की प्रत्येक ऍक्टर एखादी फिल्म करण्याअगोदर प्रोड्युसर सोबत एक कॉन्ट्रॅक्ट करीत असतो. या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍक्टर आणि प्रोड्युसर यांच्यातील सर्व मागण्या आणि अटी मान्य केल्या जातात आणि त्यानुसारच काम होत असते.

यापूर्वी फक्त सलमान खानने आपण इंटिमेट करणार नसल्याची अट आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी अफवा आहे की, टायगर ने आपल्या गर्लफ्रेंड ‘दिशा पाटणी‘ च्या म्हणण्यानुसार आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे नवीन नियम जोडले आहेत. इतरांच्या प्रेयसी सारखीच दिशा सुद्धा टायगर बाबतीत जास्त पझेसिव्ह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here