राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘व्हिलेज रॉकस्टार‘ या चित्रपटाची औपचारिकरित्या ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. रीमा दास दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्करसाठी पुढच्या वर्षीच्या 91 व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात भारताचं नेतृत्व करणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने या बातमीची घोषणा केली. ऑस्कर मधल्या ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ प्रकारासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे.

मागच्या आठवड्यात ऑस्कर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ‘एस व्ही राजेंद्रसिंग बाबू’ यांनी याबद्दल पत्रकारांना माहिती दिली.

ह्या चित्रपटातील मुख्य पात्र ही एक लहान मुलगी आहे जीच नाव ‘धनू’ आहे, ती दारिद्र्य अवस्थेतील मुलगी असून, दारिद्र्यावर मात करत ती कशी आपलं स्वप्न पूर्ण करते आणि एकेदिवशी आपल्या स्वतःसाठी एक गिटार कसं मिळवू शकते, याबद्दल हा चित्रपट आहे.

ह्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर हा 2017 मध्ये टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल येथे प्रदर्शित झाला. तसेच 70 मानांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये पण हा प्रदर्शित करण्यात आला.

पुढच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी 28 चित्रपटाची यादी तयार करण्यात आली आहे. यात संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’, आलीया भट हीचा ‘राझी’, राणी मुखर्जी चा ‘हिचकी’ तसेच शोजित सिरचर यांचा ‘ऑक्टोबर’, तरबेज नुराणी यांचा ‘लव्ह सोनिया’, ‘हलका’, ‘कडवी हवा’, ‘टुंबाड’ आशा 28 चित्रपटाचा समावेश आहे.

आतापर्यंत कुठल्याही भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार भेटलेला नाही. ऑस्कर च्या उत्तम पाच (बेस्ट फाईव्ह) चित्रपटात समावेश झालेला शेवटचा बॉलिवूड चित्रपट हा आशुतोष गोवारीकर यांचा इ.स. 2001 मधील ‘लगान’ होय. त्याच्यानंतर आता रीमा दास यांच्या या चित्रपटास पुरस्कार भेटण्याची शक्यता वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here