बिग बॉस 12 मध्ये सध्या महत्वाचे वळण आले आहे. बिग बॉस मध्ये सध्या 2 सेलीब्रीटी वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहेत, त्यात ‘मराठी बिग बॉस’ मधील विजेती मेघा धाडे आणि ‘साथ निभाना साथिया’ या सिरीयल मधील कलाकार रोहित सुचंती हे दोघे बिग बॉस 12 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकत्याच एका इंटरव्हीव्यु मध्ये मेघाने आपल्या वाईल्ड कार्ड एंट्री बद्दल सांगितले आहे. या एंट्रीबद्दल बोलत असताना मेघा म्हणाली कि, ‘मी या शो मध्ये एंट्री तर करणारच आहे आणि निश्चित जिंकणार आहे.

इन्स्टाग्रामवरील आपल्या व्हिडीओ मध्ये मेघा म्हणाली की, “काही कारणामुळे बिग बॉस 12 मधील घडामोडींना मी फॉलो करू शकले नाही, पण फक्त एकाच आठवड्यात त्यासर्व घडामोडी आणि सध्याचा गेम लक्षात घेऊ शकते शकते.”

मेघाने बिग बॉस 12 मधील सध्याच्या पार्टीसिपंट्सना उद्देशून म्हटले आहे की, “जर त्यांना मी बाहेरून आलेली साधी स्पर्धक वाटत असेल तर मी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला प्रेक्षकांव्यतिरिक्त कोणीही घरातून बाहेर काढू शकत नाही, मी प्रेक्षकांचे माझ्या परीने होईल तेवढे संपूर्ण मनोरंजन करणार. बिग बिस मराठी मध्ये मी 100 दिवस त्या घरात राहिले आहे आणि त्याच प्रकारे मी बिग बॉस 12 मध्येही राहू शकते.”

बिग बॉस 12 च्या स्पर्धकांनी या रिऍलिटी शोला आणखी मनोरंजक करण्यासाठी कंबर कसली असल्याचं दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here