बिग बॉस 12 अगोदरपासूनच मसालेदार घटकांमुळे लोकप्रिय रियलिटी शो बनला आहे. सुरभी राणाच्या पहिल्या वाइल्ड कार्ड एंट्रीमुळे, तिने घरात प्रवेश केल्यामुळे घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाले आहे.

बिग बॉस 12 यांच्याकडून नुकतंच ट्विटर वर ट्विट आली आणि आणखी एका वाईल्ड कार्ड एंट्री बद्दल सांगण्यात आले आहे. परंतु अद्याप त्या व्यक्तीच नाव बाहेर आले नाहीये. परंतु या न्यूज शी संबंधित रिपोर्ट्स नुसार बॉलीवूड ऍक्टरेस किम शर्मा हि वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री किम शर्मा यांनी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासोबत ‘मोहोब्बते’ या चित्रपटामध्ये रोल केला होता. या न्यूज बद्दल किम यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी, ‘बिग बॉस कडून अशा पद्धतीची कसलीही ऑफर आली नसल्याचे स्पष्ठ केले आहे.’ हे पण तितकेच खरे आहे कि मागच्या सीजन मध्ये हिना खान ने सुद्धा असाच नकार दिला होता परंतु नंतर ती बिग बॉस मध्ये फक्त आलीच नाही तर रनर अप कन्टेस्टंट सुद्धा बनली.

प्रेक्षकांसाठी सुरभी राणा नंतर आता येणारी वाईल्ड कार्ड एंट्री कोण करेल ही एक इंटरेस्टिंग बाब ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here