katrina kaif
नुकतंच शाहरुख खानच्या वाढदिवसा दिवशी त्याच्या येणाऱ्या चित्रपटाचं ‘Zero’ चं ट्रेलर रिलीज करण्यात आलं होतं. या ट्रेलर मध्ये असं दिसून येतंय की, चित्रपटात प्रत्येकाचा अभिनय हा पाहण्यासारखा असेल.

परंतु त्यातल्या त्यातही अनुष्काच्या अभिनयाची खुप चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक जणांनी अनुष्का शर्माच्या प्रशंसेचे पहाड बांधले आहेत. अनेकांनी तर शाहरुख खान पेक्षाही अनुष्काच्या कामाला पसंदी दिली आहे.

चित्रपटाची स्क्रिप्ट ही सर्व कलाकारांना आधी पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक पात्राची ओळख प्रत्येक कलाकाराला होते. त्यामुळे अनुष्का साकारत असलेल्या पात्राची ओळख ही कॅटरिनाला झाली होती. या पात्राचे महत्त्व समजून कॅटरिनाने हा रोल मला मिळावा यासाठी याचना केली होती. खूप प्रयत्न करूनही तिला हा रोल मिळाला नाही. स्वतः कॅटरिनाने रेड चिलीज एंटरटेनमेंट च्या ‘Zero का साच’ सेगमेंट मध्ये बोलताना ही माहिती सांगितली. रेड चिलीज यांच्या कडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. त्या व्हिडीओ मध्ये चित्रपटाचे डायरेक्टर आनंद एल राय सोबत ऍक्टर शाहरुख खान, तसेच दोन ऍक्टरेस कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसत आहेत.

या व्हिडीओ नुसार शाहरुख खानला बबिता कुमारी चं रोल करणारी कॅटरिना कैफ हिचाच रोल खूप आवडला आहे. यात बबिता कुमारी ही एक दारुडी ऍक्टरेस असते. अनुष्का शर्माला शाहरुख खानचा रोल खूप आवडला आहे. त्यात तो Bauua Singh जी खूप मोठी मोठी स्वप्ने पाहणारा मेरठचा तरुण असतो. जेंव्हा कॅटरिनाची बारी आली तेंव्हा तिने सांगितले की, मी जेंव्हा स्क्रिप्ट वाचले तेंव्हापासूनच मला अफिया युसुफझई भिंडेर म्हणजे अनुष्काचा रोल खूप म्हणजे खूपच आवडला होता. परंतु तिला हा रोल मिळाला नाही. शाहरुखने या गोष्टीमुळे कॅटरिना ची चिमटी घेतली, तो म्हणाला तुला हा रोल आवडत आहे तर मग तुझ्या रोलचं काय ? यावर कॅटरिना ने शानदार उत्तर दयेत म्हटले, ” मला माझा रोल आवडतो पण मला अनुष्काच्या रोलबद्दल प्रेम आहे.” यानंतर कॅटरिना इमोशनल झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावर ती म्हणाली मी हा रोल मला मिळावा यासाठी डायरेक्टर आनंद एल राय यांच्याकडे खूप मागणी केली पण मला हा रोल मिळाला नाही. तिथेही ती इमोशनल झाली होती. या गोष्टीची पुष्टी तिथे उपस्थित असलेले डायरेक्टर आनंद यांनी दिली. ही गोष्ट ऐकून शाहरुख आणि अनुष्का हे हादरलेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here