आज SRK म्हणजे शाहरुख खान याला सर्व जण बॉलीवूड चा बादशाह असेही म्हणतात, याचा आज जन्म दिवस आहे. हाच प्रसंग साधून चित्रपट निर्मात्यांनी आज SRK च्या Zero चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. Zero चा ट्रेलर रिलीज झाला आहे , त्यात शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या तिघांचा लव्ह ट्रायअँगल असल्याचं दिसत आहे. त्यात SRK ने 38 वर्षाच्या माणसाची भूमिका केली आहे जो आपल्या जोडीदाराच्या शोधात असतो.

ट्रेलर ची सुरुवात SRK कडून होते त्यात त्याचे नाव Bauua Singh असते. तो मॅट्रिमोंनी ऑफिस मध्ये असतो आणि त्याला तेथे अनुष्काची फोटो दिसते. ती फोटो बघून तो तिथेच स्तब्ध होतो.अनुष्का शर्माच नाव Aafia आहे आणि ती व्हीलचेअर वर असलेली मुलगी असते. ती cerebral plasy या रोगाने ग्रस्त असते. चित्रपट विश्वात अनुष्का(Aafia) ही फेमस व्यक्तित्वाची भूमिका करत आहे. पाहताक्षणी SRK (Bauua Singh) हा अनुष्काच्या प्रेमात पडतो. पण त्यांच्या प्रेमाचा मार्ग दिसतो तेवढा सोपा दिसत नाही.

त्या ट्रेलर मध्ये Bauua Singh च्या घरेलू जीवनाचं दर्शन ही आपल्याला घ्यायला मिळेल. Tigmanshu Dhulia याने त्याच्या वडिलांचा रोल केला आहे तर Mohammad Zeeshan Ayub याने Bauua singh च्या मित्राचा रोल केला आहे. त्यांनंतर आपल्याला कॅटरिना कैफ च्या रोल पाहायला मिळेल. आणि असं वाटतंय की कॅटरिना कैफ ही चित्रपटात एका फेमस ऍक्टरेस चा रोल करत आहे. Bauua Singh हा तिच्याही प्रेमात पडतो. पण त्यांचा रोमान्स हा व्यवस्थित चालत नाही.

 

शाहरुख खानचे काही शॉट्स आपल्याला या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतील. जरी हा ट्रेलर आपल्याला खूप एंगेजिंग वाटत असेल तरी या 3 मिनिटांच्या व्हिडीओ मध्ये त्यांनी पुष्कळ शॉट्सना जागा दिली आहे. शेवटचा शॉट ज्यात SRK म्हणतो, ” मी चंद्रावर गेलो होतो, आणि हा ट्रेलरचा सर्वात जास्त लोकांची क्युरिओसीटी वाढवणारा शॉट आहे.”

या ट्रेलरला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. बाकी या तीन दिगग्ज कालाकारांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही लोकांना इंटरटेनिंग परफॉर्मन्स देऊ. हे तिघे जण आधी यश चोपडाच्या ‘जब तक है जान‘ मध्ये पाहिले गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here