zero-poster-copied

शाहरुख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधून डायरेक्टर आनंद एल राय यांनी शाहरुख, अनुष्का आणि कॅटरिना यांच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. अनेकांना तो ट्रेलर खूपच आवडला आहे, पण अनेक जण असेही आहेत की त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात. त्यांनी या चित्रपटा विरोधात आंदोलन करणे सुरू केले आहे.

आपल्याला माहितीच आहे, चित्रपटाचे भरपूर पोस्टर आता रिलीज केले गेले आहेत. त्यातील काही हे खूपच प्रसिद्ध आहेत. एक पोस्टर ज्यात कॅटरिना आणि शाहरुख खान आहेत आणि कॅटरिना शाहरूख पेक्षा उंच आहे. त्यात कॅटरिना ने लाल ड्रेस घातला आहे, ते पोस्टर हॉलिवूड चित्रपटातून कॉपी करण्यात आले आहे. त्या हॉलिवूड चित्रपटाचं नाव ‘अनहोम लाहोटर‘ असं आहे. त्यातही एक हॉलिवूड ऍक्टरेस कॅटरिना प्रमाणेच लाल ड्रेस घालून उभी आहे आणि तीला समोरच्या ऍक्टर पेक्षा खूपच उंच दाखवण्यात आलं आहे.

त्यानंतर आणखी एक पोस्टर आहे ज्यात फक्त शाहरुख खान आहे, त्याच्या गळ्यात पैशांची माळ आहे, तेच पोस्टर वादात अडकलं आहे. त्या पोस्टर मध्ये शाहरुख खानने कृपान घातले आहे आणि अशा अवस्थेत कृपान घालणे म्हणजे शीख धर्माची अवहेलना केल्या सारख आहे. कारण कृपान हे शीख धर्माच्या पवित्र पाच चिन्हापैकी एक आहे.

zero movie

दिल्लीच्या गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने तसेच अनेक शीख समुदायाच्या संघटनेने यावर विरोध दर्शविला आहे. चित्रपटात शाहरुख ने कृपान उघड्या अंगावर परिधान केलं आहे आणि त्याबरोबरच पैशाची माळही घातली आहे. शीख धर्म वासीयांना हे कृत्य शीख धर्माची टिंगल केल्या सारख वाटत आहे. त्यामुळे दिल्लीच्या गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन परमजीत सिंह यांनी म्हटलं आहे,” शाहरुखने चित्रपटाच्या पोस्टर मध्ये ज्याप्रकारे कृपान धारण केलं आहे, ती एक मजाक म्हणून दाखवलं गेलं आहे आणि अशा प्रकारचा मजाक आम्हाला सहन करण्या पलिकडचा आहे.”

या घटनेवर शाहरुख कशा प्रकारे रिऍक्ट करतील ही पाहण्याची गोष्ट आहे. आणि लोकं या चित्रपटाला कशा प्रकारे प्रतिसाद देतील ते ही येत्या काळात आपल्याला कळेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here