आयफोन, आयपॅड, आयमॅक अशी उत्पादने बाजारात आणून स्मार्ट दुनियेचे चित्रच पालटून टाकणाऱ्या स्टिव्ह जॉब्जच्या एप्पलने आपल्या मेगा इव्हेंट ची घोषणा गुरुवारी केली आहे. या होणाऱ्या मेगा इव्हेंटसाठी Apple मिडियाला इन्व्हिटेशन पण पाठवण्यास सुरुवात केली आहे. १२ सप्टेंबरला २०१८ ला हा इव्हेंट एप्पल पार्क येथील स्टीव्ह जॉब थिएटर येथे होणार आहे.

इंटरनेट वर लीक झालेल्या वृत्तानुसार असे समजते कि Apple आपल्या आयफोनचे ३ नवीन मॉडेल या इव्हेंट मध्ये लाँच करू शकतो, ज्यामध्ये Iphone XS जे iPhone X चे अपग्रेडेड वर्जन असेल ज्यात 5.8 इंचाचा डिस्प्ले असू शकतो, दुसरा म्हणजे Iphone X प्लस ज्यामध्ये ६.५ चा ओएलईडी डिस्प्ले असू शकतो व तिसरा वर्जन 6.1 इंचच्या एलसीडी डिस्प्ले सोबत असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही Apple आपल्या फोन मधील चिप अपग्रेड करू शकतो ज्या मुळे फोनची स्पीड वाढण्यात मदत होईल

तसेच हि तिन्ही हँडसेट चे डिस्प्ले iphone x च्या नॉच डिस्प्ले प्रमाणेच असतील. त्याबरोबरच या तिन्ही हँडसेट मध्ये फेस आईडी रेकॉगनेशन फिचर पण असेल. तसेच तिन्ही आयफोनपैकी एका व्हेरिएंट मध्ये ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किमतीच्या बाबतीत सांगायचे झाले तर मीडिया रिपोर्टनुसार या तिन्ही हँडसेटपैकी एकाची किंमत हि ५०,००० रुपयांपेक्षा कमी असू शकते.

या सोबतच या इव्हेंट मध्ये आयपॅड प्रो चे दोन नवीन वर्जन आणि सोबत Apple ची 4th Genration स्मार्ट वॉच ज्यात एज टू एज डिस्प्ले असण्याची शक्यता आहे हे सुद्धा रिलीज होऊ शकतात

आता यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी खऱ्या निघतील हे आपणाला १२ सप्टेंबरला समजेल, त्या दिवशी नवीन येणाऱ्या आयफोन बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला हे बघ भाऊ डॉट कॉम वर वाचता येईल या साठी तुम्ही या वेबसाईटला बुकमार्क करून नोटिफिकेशन सबस्क्राईब करायला विसरू नका.