भाषा हि संवादासाठी अत्यंत गरजेची आहे. भाषेमुळे अनेक गोष्टींचा अर्थ समजण्यास मदत होते. आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात मराठी आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये कामाकरिता आलेल्या लोकांना मराठी शिकावेच लागते, तसेच आपणही बाहेर कुठे गेलो तर आपल्याला तेथील भाषा शिकणे गरजेचे भासते. नवीन भाषा शिकल्याने अनेक फायदे होतात त्यापैकीच काही फायदे आज आपण पाहणार आहोत.

१. स्मरणशक्तीमध्ये वाढ :-

नवीन भाषा शिकत असताना आपल्या शब्दसंग्रहामध्ये वाढ होते त्याचा फायदा आपल्या स्मरणशक्ती मध्ये वाढ होण्याकरिता होतो. तसेच आपल्यात मानसीक सतर्कता निर्माण होते ज्यामुळे नवनवीन शब्द लक्षात राहण्यास मदत होत असते.

२. मल्टिटास्कर होण्यास मदत होते :-

विज्ञान असे दर्शविते कि द्विभाषिक वक्ता हा कोणत्याही समस्या सोडविण्याची क्षमता बाळगून असतो. नवीन भाषेशी निगडीत असल्याने त्या व्यक्तीस आणखी भाषा शिकण्यास चालना मिळत असते.

३. नवीन भाषेबद्दल सांस्कृतिक कौतुक वाटणे :-

विविध संस्कृतींच्या प्रदर्शनामुळे नवीन भाषा शिकणे हे आणखीन काही कार्यामध्ये मौल्यवान योगदान देऊ शकते. काही अभ्यासांमधून असे दिसून येते की द्विभाषिक आणि अधिक सकारात्मक दृष्टीकोन असणे यामध्ये सहसंबंध आहे.

४. चांगला संवादक होण्यास मदत होते :-

आपले मत इतरांपर्यंत कसे व्यक्त करायचे आहे त्यापेक्षा इतरांना आपले म्हणणे कसे समजेल याकडे लक्ष देणे महत्वाचे असते. नवीन भाषेमुळे तुम्हाला स्वतःवर एक आत्मविश्वास आलेला असतो ज्यामुळे तुम्हाला चांगला वक्ता होण्यास मदत होते.

५. क्रिएटिव्हिटीस प्रोत्साहन मिळते :-

दुसर्या भाषेमध्ये विलीन होऊ शकणार्या नैसर्गिक परिणामापैकी एक म्हणजे त्या संस्कृतीत स्वतःला विसर्जित करणे. यामुळे आपल्या स्वत: च्या जगातच काही गोष्टींमध्ये बदल दिसून येतो, आणि तो व्यक्ती अगोदरपेक्षा काहीसा क्रिएटिव्ह दिसून येतो.

६. बुद्धीमध्ये वाढ :-

आपली बुद्धी सक्रीय ठेवण्याचे सर्वोत्तम मार्ग म्हणजे शिकणे, बोलणे आणि इतर भाषांमध्ये वाचणे. वैज्ञानिकांच्या मते द्विभाषिक वक्त्याच्या बुद्धीच्या जास्त वापर असल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये वाढ दिसून येते.

असे काही महत्वाचे फायदे आपणास नवीन भाषा शिकण्यामागे दिसून येतात.