दिल्ली म्हणले कि प्रथम आठवण होते ती तिथल्या होणाऱ्या वायू प्रदूषणाची. परंतु आता तेथील जनतेला गेल्या काही वर्षांपासून आणखी एका डोके दुखीला सामोरे जावे लागत आहे. तो म्हणजे तेथील कचरा व त्याची निष्काळजीपणाने केलेली विल्हेवाट.

गेल्या वर्षी म्हणजे १ सप्टेंबरला गाजीपूर येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पडल्यामुळे त्यात अडकून दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता व त्याचबरोबर काही लोकही गंभीर जखमी झाली होती. भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी, येथील अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील नागरिक व प्रशासनाने एकत्र मिळून अनेक उपपययोजना आखल्या व नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला, पण आपल्या देशाच्या राजधानीत कचऱ्याचा पर्वत मात्र वाढत चालला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, प्रशासनाने कचऱ्याच्या ढिगाची उंची सुरुवातीला २० मीटर पर्येंत निर्धारित मर्यादेत केली होती, मात्र त्याची उंची गेल्यावर्षी म्हणजे जेंव्हा अपघात घडला त्या वर्षी, त्याची उंची हि ६० मीटर पर्येंत पोहचली होती. मात्र, गुरुवारी पूर्व दिल्ली महानगरपालिका (एडीएमसी) च्या एका वरिष्ठ अधिका-याने त्याची पाहणी केली असता, सांगितले की कचऱ्याच्या ढिगाची उंची हि ६५ मीटर पर्येंत पोहचली आहे. जर हि उंची अशीच वाढत गेली तर काही दिवसातच हा कचऱ्याचा ढिगारा कुतुबमिनारलाही मात देऊ शकतो. कारण कुतुबमिनारची उंची हि ७३ मीटर इतकी आहे. सध्याची आकडेवारी पाहता फक्त ८ मीटर चा फरक शिल्लक राहतो. जर हे असेच चालू राहिले तर काही दिवसातच कचऱ्याचा हा ढीग कुतुबमिनारचा हि रेकॉर्ड तोडू शकतो.

कचरा विल्हेवाटबद्दल पर्यायी व्यवस्थेच्या पर्यायांबद्दल विचारले असता, तेथील एडीएमसीच्या पर्यावरण व्यवस्थापन विभागातील मुख्य अभियंता प्रदीप खंडेलवाल यांनी सांगितले कि, “आम्ही सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहोत आणि त्यामुळे नवीन प्रकल्पांवर गुंतवणूक करणे सध्याच्या घडीला शक्य होणार नाही”. त्यामुळे कचरा व्यवस्थापनेचा प्रश्न तिथे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अधिकृत माहितीनुसार, शहरात दररोज २६००-२७०० मॅट्रिक टॅन कचरा तयार होतो, त्यापैकी ११०० मेट्रिक टॅन कचरा हा गाजीपूरयेथील डम्पिंगग्राऊंड मध्ये भरला जातो. गाजीपूरचा संपूर्ण डम्पिंग भाग हा ७० एकर क्षेत्रफळात पसरलेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात लोकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here