गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे केरळमध्ये भयंकर पूर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळ मधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १०० वर्षातील सर्वात भीषण परिस्थिती आहे. केरळमधील आतापर्यंत जवळपास ८० धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भाग हा पाण्याखाली गेला आहे. या घटनेमुळे आतापर्यंत ३२४ जणांचा बळी गेला आहे. तर जवळपास २ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यापूर्वी  म्हणजेच १९२४ साली केरळमध्ये पावसामुळे अशीच भीषण परिस्थिती ओढावली होती.

या सर्व घटनांचा अढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी काल रात्री म्हणजे शुक्रवारी रात्री केरळ मध्ये दाखल झाले होते, पूरग्रस्त भागाची त्यांनी हवाई पाहणी केली. यावेळी तेथील स्थानिक आमदारांनी पंतप्रधानांकडे मदतीची याचना केली.

सध्या एनडीआरएफ पथक आणि भारतीय सैन्यदलाच्या ७०० जवानांकडून येथील भागात बचावकार्य सुरु आहे. हि सर्व पथके आधुनिक सुविधांनी आणि उपकरणनाणीं सज्ज आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये आत्तापार्येंत ४,६०० लोकांना वाचवण्यात आले आहे. पीडित लोकांना वाचवण्यासाठी आम्ही रात्रदिवस काम करू अशी माहिती ब्रिगेडिअर अरुण सी जी यांनी दिली.

ह्या मदत कार्यासाठी जास्तीतजास्त हेलिकॉप्टर पुरवण्यात यावे अशी विनंती राज्याने केंद्राला केली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केरळला ५०० कोटींची मदत निधी जाहीर केली आहे. याशिवाय रेल्वे कडून केरळच्या दिशेने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रवाना करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू राज्यातून रेल्वेने २.८ लाख लिटर पाणी केरळकडे रवाना करण्यात आले आहे. तसेच नौदलाने आयएनएस दीपक हि युद्ध नौका मुंबई हुन कोची कडे रवाना केली गेली आहे, यात पिण्याचे आठ लाख लिटर पाणी आहे. १९ ऑगस्ट पर्येंत हि नौका कोचीला पोहचेल आणि पूरग्रस्त लोकांना मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here