आपल्याला माहीत आहे २०१६ मध्ये केंद्रीय सरकारने UPI- Unified Payment Interface लाँच केले होते. भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाने(NPCI) याच UPI ची सुधारीत आवृत्ती अनेक नव्या फीचर्स सहित दुसरी आवृत्ती लाँच केली आहे. RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी UPI – 2.0 चं औपचारिक उद्घाटन भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाच्या आणि RBI च्या काही निवडक सदस्यांच्या उपस्थितीत केलं. UPI हे जरी भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाने तयार केलं असलं तरी त्याचं नियमन मात्र RBI च करते.

★ UPI बद्दल माहिती –

● UPI हे जलध, प्रत्यक्ष वेळ ‘देयक प्रणाली’ आहे. भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाने देशातील आंतरबँक व्यवहार वाढवण्या करीता, जलध करण्याकरीता याची निर्मिती केली होती.

● या कार्यप्रणालीच नियमन RBI कडून केलं जातं आणि या मुळे आपल्या मोबाईलचा वापर करून दोन बँकेच्या अकाउंट वरून जलध फंड पाठवता येतात.

● UPI -2.0 या सुधारित आवृत्तीमुळे आता आपल्याला भविष्यात ज्या दिवशी पेमेंट पाठवायची आहे त्या दिवसाची वेळ निश्चित करता येते आणि त्यामुळे त्या दिवशी त्या वेळी आपोआप पेमेंट होऊन जाईल अर्थात पेमेंट शेड्युल करता येईल.

● UPI वापरण्यासाठी फक्त एक बँक अकाउंट आणि एक स्मार्ट फोन लागतो. कार्ड नंबर, अकाऊंट नंबर, पासवर्ड, IFSC कोड या पैकी काहीच लागत नाही.

★ भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ(NPCI) –

■ NPCI ची स्थापना 2008 मध्ये झाली. NPCI कंपनी कायदा, 2013 च्या गट-8 अंतर्गत एक संस्था आहे जी नफ्या करीता काम करत नाही.

■ काही मोठ्या बँकेच्या गटाने ( SBI, ICICI, PNB, BoB, HDFC etc.) याची मालकीयता स्वीकारली आहे आणि या संस्थेसाठी RBI ने पाठपुरवठा केला आहे.

■ RuPay डेबिट कार्ड NPCI नच लाँच केलं आहे. त्यामुळे इतर कार्डच्या तुलनेत RuPay ला सर्विस चार्ज खूप कमी लागतो.

■ Bharat QR हे सुद्धा पेमेंट सोप्यारीतीने करता यावे म्हणून NPCI नेच लाँच केले.