Musically हा ऍप्प याच्या लहान व्हिडीओ बनविण्याच्या शैलीसाठी प्रसिद्धीस आला होता. चार वर्ष जुना असलेला हा ऍप्प सध्याच्या मध्यम वयीन व तरुण पिढीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे आणि आता या ऍप्पचे चक्क नाव बदलविण्यात आले आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने अनेक फिल्मइंडस्ट्रीतील कलाकारांनी आपल्या फेसबुक व इन्स्टाग्रामवर टिक टॉक च्या नवीन ऍप्प चा वापर करून शुभेच्छा दिल्या आहेत, आता हा प्रश्न पडणे साहजिक आहे की का म्युझिकली चे नाव बदलून टिक टॉक करण्यात आले.?

टिक टॉक हा बीटडान्स या कंपनीच्या मालकी हक्काचा ऍप्प असून त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबर २०१७ मध्ये म्युझिकली या ऍप्प ला सुमारे $१ बिलियन डॉलर एवढ्या किमतीत खरेदी केले होते, आणि आता त्यांनी Musically या नावाचा वापर न करता या ऍप्प ला टिक टॉक या नावाने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

टिक टॉक या ऍप्प मध्ये अपडेट झाल्यानंतर वापरकर्त्यांना त्यांचा पूर्वीचा सर्व डेटा या नवीन ऍप्प मध्ये पाहायला मिळेल. या नवीन ऍप्प मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जसे फेसबुक मध्ये ‘वेल बीइंग’ फिचर आहे तसेच या ऍप्प मध्ये सुद्धा त्यापद्धतीची सेटिंग असेल त्यात वापरकर्ता जर जवळपास २ तासापेक्षा जास्त वेळ ऍक्टिव असेल तर त्याला नोटिफिकेशन येईल.

म्युझिकली आणि टिक टॉक हे जरी सारखेच ऍप्प असले तरीही जुन्या वापरकर्त्यांना म्युझिकली शी एक वेगळीच आवड निर्माण झाली होती. या जुन्या वापरकर्त्यांना बळजबरीने नवीन ऍप्प वापरण्यास लावणे तितके योग्य वाटत नाही. टिक टॉक ऍप्प जरी चीन मध्ये प्रसिद्धीस आलेला असला तरीही आता इतर देशांमध्ये त्याची प्रसिद्धी तशीच कायम राहील कि ऍप्प ला नुकसान सहन करावे लागेल, हा आता एकच प्रश्न आहे.