होय, आता तुम्ही बॉयफ्रेंड भाड्याने मिळवू शकता. मुंबईच्या कुशल प्रकाश या २९ वर्षीय व्यक्तीने लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी एक मोबाईल अँप्लिकेशन लाँच केले आहे. या अँप्लिकेशनचं नाव Rent A Boy|Friend(RABF) असं आहे. या अँप्लिकेशनचा उद्देश लोकांना मानसिक आजारातून बाहेर काढणे, दुःख, नैराश्य आणि एकाकीपणा या पासून सर्वानी स्वतःला स्वातंत्र्य करावे असा उद्देश आहे. तरुणांनी याचा उपयोग करून एकाकीपणा, नैरश्यावर योग्य मार्गाने मात करावी असा उद्देश आहे.

या अँप्लिकेशन मध्ये बॉयफ्रेंडचे तीन स्तर/गट आहेत. ते पुढील प्रमाणे –

१) पहिल्या गटात जो बॉयफ्रेंड असेल तो सेलिब्रिटी गटातील व्यक्ती असेल आणि त्याचं भाडं ३००० रु प्रतितास असेल.

२) दुसऱ्या गटात जो बॉयफ्रेंड असेल तो मॉडेल असेल आणि त्याचं भाडं २००० रु प्रतितास असेल.

३) तिसऱ्या गटात कोणताही सामान्य व्यक्ती बॉयफ्रेंड म्हणून काम करू शकतो आणि त्याचं भाडं ४०० रु प्रतितास असेल.

या अँप्लिकेशनसाठी बॉयफ्रेंड बनण्याची पात्रता –

१) या अँप्लिकेशनसाठी बॉयफ्रेंड म्हणून काम करायचं असेल तर त्या व्यक्तीच्या नावे त्याच्या भूतकाळात कोणताही गुन्हा नोंद असू नये. अँप्लिकेशन मध्ये नोंदणी करताना त्याचा भूतकाळातील क्रिमिनल रेकॉर्ड तपासला जाईल.

२) त्या व्यक्तीने कमीत कमी 10 वी ची बोर्ड परीक्षा दिलेली असावी. लोंकाना मानसिक आजारातून वाचवणे आणि बॉयफ्रेंडच्या शिक्षणाची मर्यादा यात काहीच समंध नसल्यामुळे मर्यादा कमी ठेवली आहे.

या अँप्लिकेशन चा उद्देश फक्त बॉयफ्रेंड पुरवणे हा एकच नसून यात एक टोल फ्री नं. सुद्धा त्यांनी दिला आहे. ज्यावर फोन करून लोकं तज्ञ डॉक्टरांना आणि मानासउपचार तज्ज्ञांना बोलून आपल्या उपचारासाठी योग्य मार्गदर्शन मिळवू शकतील. या अँप्लिकेशनचा उपयोग अनैतिक समंधांना बढावा मिळण्याकरिता होऊ नये या साठी कुशल प्रकाश यांनी योग्य ती काळजी घेतली आहे.