सौंदर्यस्पर्धेपासून सुरु झालेल्या प्रियांकाचा प्रवास आज तिला बराच पुढे घेऊन आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘देसी गर्ल’ म्हणून ओळख आलेल्या प्रियांकाने काही वर्षांपूर्वी तिचा मोर्चा आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वाकडे वळवला. ‘क्वांटिको’ या सीरिजसाठी तिची निवड झाली आणि परदेशातही तिच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. ‘क्वांटिको’मध्ये प्रियांकाने साकारलेली ‘अॅलेक्स पॅरिश’ कोणासाठी स्टाईल आयकॉन ठरली, कोणासाठी ती धाडसी महिला. पण, आता मात्र प्रियांका साकारत असलेली ‘अॅलेक्स’ प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.‘क्वांटिको’च्या तिसऱ्या पार्टच्या शेवटच्या भागासोबतच तिने प्रेक्षकांचा निरोपही घेतला आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘क्वांटिको’ या सीरिजसोबतचा आपल्या प्रवासाचा शेवट झाल्याचं स्पष्ट केलं.

या पर्वाचा शेवट होण्यासोबतच मी अलेक्स पॅरिशलासुद्धा निरोप देत आहे. तुम्ही पाहिलंच असेल, तिचा प्रवास आता पूर्णता गेला असून,एक अभिनेत्री म्हणून हा खुपच सुरेख अनुभव होता.अॅलेक्स साकारणं माझ्यासाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या प्रचंड आव्हानात्मक होतं. पण, त्याचमुळे माझ्या मते मी काही सीमा ओलांडू शकले

असं म्हणत मुख्य भूमिका साकारण्यासाठीचे काही समजही आपण मोडीत काढल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

As the series ends, I am saying goodbye to Alex Parrish. As you’ll see, her story will come full circle…and that is the best feeling as an actor. Bringing Alex to life has challenged me physically and emotionally, but even more significant it has (I hope) cracked the door open for female talent and women of color to play leading ladies. Thank you for opening your homes and hearts to me every week! Thank you to the cast and crew of #Quantico for being such an amazing team to work with, for all the memories that I will cherish…memories of laughter, of learning new things, of making friends for life. It was a pleasure working with each and every one of you, and I look forward to crossing paths again! Thank you @joshsafran @abcnetwork @mseitzman @disney and everyone who worked on the show

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने या कार्यक्रमातील सर्वच सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. त्याशिवाय सेटवरील काही फोटोही शेअर केले. येत्या काळात प्रियांकाच्या हाती बरेच प्रोजेक्ट असल्याचं कळत आहे. पण,

‘क्वांटिको’ आणि ‘अॅलेक्स पॅरिश’सोबत असणारं तिचं नातं नेहमीच खास राहील यात शंका नाही.