ट्रान्सजेंडरच्या भूमिकेसाठी या सीरिजमधील ‘कुक्कू’ म्हणजेच अभिनेत्री ‘कुब्रा सैत’ हिने अनेकांचीच मनं जिंकली आहेत, जाणून घ्या दर्शकांच्या प्रश्नाचं उत्तर देत ती म्हणाली तरी काय…

वेब सीरिजच्या या विश्वात काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजची चर्चा सध्या सुरु आहे. सोशल मीडियापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत प्रत्येक ठिकाणी या सीरिजशी निगडीत अनेक प्रश्न, विनोद, मीम्स याविषयीच बोललं जात आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्रकाशझोतात येणारा मुद्दा म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधील कुक्कू. अतिशय लहान पण, तितक्याच प्रभावी अशा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेसाठी या सीरिजमधील ‘कुक्कू’ म्हणजेच अभिनेत्री कुब्रा सैत हिने अनेकांचीच मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावर सध्या तिच्याविषयीच जास्त सर्च केलं जात असून, ती खरंच ट्रान्सजेंडर आहे का?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याविषयी जेव्हा कुब्राला कळलं तेव्हा ‘मिड डे’शी संवाद साधताना ती म्हणाली, ‘माझ्यामते ही मी साकारलेल्या भूमिकेसाठीची पोचपावतीच आहे. मी एक सर्वसामान्य महिला आहे, जिला पुरुष आवडतात. मुळात या माध्यमातून मी ‘कुक्कू’ची भूमिका साकारण्यासाठी सक्षम आहे, हेच दाखवून दिलं. सहा वर्षांची असताना ज्यावेळी मी शाळेत एका झाडाची भूमिका साकारली होती, अगदी त्याच प्रामाणिकतेने मी कुक्कूही साकारली आहे’, असं कुब्रा म्हणाली.

‘सेक्रेड…’मधील एका सीनमध्ये ‘कुक्कू’ला धैर्ययुक्त दाखवण्यात आलं आहे. ज्या सीनसाठी तिच्याकडून जवळपास ७ वेळा रिटेक घ्यावे लागले होते. खुद्द कुब्रानेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं.

“मी एक सर्वसामान्य महिला आहे, जिला पुरुष आवडतात” या वरून असा समजून येते की कुब्रा सैत सर्व सामान्य महिला आहे हे सिद्ध झाले.