योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलिने व्हॉट्सअॅपलाही स्वदेशी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने किंभो नामक मेसेजिंग App मार्केट मध्ये आणले होते, मात्र अॅप लाँच केल्यानंतरच त्यांना काही दिवसातच हे अॅप मागे घ्यावे लागले होते कारण या App बद्दल अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या होत्या, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप वापरण्याजोगे नसल्याचे युजर्सचे म्हणणे होते.

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदेवबाबा त्यावेळी म्हणाले “किंभो अॅप गुगलनं प्लेस्टोरवरून काढले नसून, पतंजलीनेच हे अॅप प्ले स्टोरवरुन हटवलं”, त्यावेळी ते असेही म्हणाले पतंजलीकडून तयार करण्यात आलेलं मेसेजिंग अॅप इतर कोणत्याही मेसेजिंग अॅपपेक्षा कमी नाही ”

सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे अॅप कॉपी करून तयार करण्यात आले होते, त्यामुळे युजर्सचा डेटा हा सुरक्षित न्हवता.

या अॅपमध्ये काही त्रुटी नव्हत्या पण आम्ही प्रायोगिक तत्वावर हे लॉंच केलं होत असे पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितल होते. प्रायोगिक तत्वावर रिलीज करून सुद्धा या App ला प्लेस्टोर वर भरपूर डाउनलोड मिळाले होते.

कदाचित यामुळेच यातील त्रुटी दुर करुन ‘किंभो’ अॅप पुनरागमनासाठी सज्ज झाले आहे, हे अॅप येत्या २७ ऑगस्टपासून नव्या फिचरसहित प्ले स्टोर व IOS स्टोर वर उपलब्ध होणार आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पतंजलीचे सह-संस्थापक बाळकृष्ण यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाउंट वरून याची अधिकृत माहिती दिली.

दैनंदिन जीवनातील वस्तू स्वदेशी वापरण्यासोबत आपल्या स्मार्टफोन मध्ये स्वदेशी App वापरण्याची हि पतंजलीची कल्पना तुम्हाला कशी वाटते हे कंमेंट मध्ये नक्की सांगा!