विनेश फोगाट हि ५० किलो फ्रीस्टाईल कुस्ती मधून आशियाई गेम्स खेळत होती. या कुस्ती मध्ये विनेश ने गोल्ड मिळवले व त्याच बरोबर तिने आपल्या नावे एक नवा इतिहास रचला. विनेश भारतातील पहिली महिला ठरली जिने आशियाई गेम्स मधून भारतासाठी गोल्ड पटकावले. या गोल्ड मेडल साठी खेळला गेलेला शेवटचा सामना हा भारत व जपान मध्ये झाला होता, त्यात भारतातील विनेशने जपानी खेळाडू ‘इरी युकी’ हिला ६-२ ने मात दिली.

आशियाई गेम्स मधून भारताला अजून पर्यंत फक्त दोन गोल्ड मेडल मिळाले आहेत त्यापैकी दोन्ही मेडल हे कुस्ती या खेळासाठी मिळाले आहेत. या खेळातील पहिला गोल्ड मेडल हा मागील रविवारी ‘बजरंग पुनिया’ या खेळाडूने मिळवले होते.

विनेश ने मागील सोमवारी जेंव्हा आपल्या खेळात सहभाग घेतला तेंव्हा तिला पायाचा त्रास होत होता तरीही तिने त्या त्रासाला न जुमानता आपल्या सर्व गेम्स मधील विरोधी खेळाडूंना मात देऊन तिने सर्वांवर विजय मिळवला. असे करत विनेश ने फायनल मध्ये गोल्ड मिळवून दाखवला.

 

विनेश आपल्या खेळात फायनल ला येण्यापूर्वी सेमी फायनल मध्ये कोरिया ची खेळाडू ‘किम’ हिला मात दिली होती. सेमीफायनल च्या अगोदर झालेल्या खेळात विनेश ने चीन च्या ‘सून’ या खेळाडूस मात दिली अशा तर्हेने विनेश ने एकूण चीन,कोरिया आणि जपान च्या खेळाडूंना मात देऊन गोल्ड मेडल आपल्या नावे केले आहे.

फोगाट बहिणींच्या आयुष्यावरील हिट चित्रपट बनवणारा अभिनेता आमिर खान याने विनेश फोगाटचे ट्विटर वरून अभिनंदन केले आहे.