अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजनीती मधील एक असे व्यक्तिमत्व ज्यांना पाहून आपल्याला खरी राजनीती व देशाबद्दल प्रेम काय असते हे माहिती होईल. आपल्या ५० वर्षाच्या कालकीर्दी मध्ये अटलजी हे एक आदर्शवादी व प्रशंसनीय राजनेता म्हणून ओळखले जात असत. अटलजी हे महात्मा गांधीजींच्या समवेत ‘भारत छोडो आंदोलन‘ मध्ये सहभागी होते, एक उत्तम राजनेता व त्यासोबतच ते एक उत्तम कवी व व्यंगचित्रकार देखील होते.

जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपले ‘चाचा नेहरू‘ यांच्या नंतर अटलजी हे एकमेव असे राजनेता होते जे सलग ३ वेळा पंतप्रधान झाले होते, पहिल्या वेळेस जेंव्हा ते पंतप्रधान म्हणून निवडून आले तेंव्हा त्यांचा कार्यकाळ फक्त १३ दिवसांचा होता परंतु त्यानंतर ते पुढील १ वर्षात परत पदावर आले आणि यावेळेसही ते फक्त १ वर्षासाठी कर्यरत होते. आणि तिसऱ्या वेळेस जेंव्हा ते पदावर आले तेंव्हा ते पूर्ण ५ वर्ष पदावर होते व तो काळ त्यांनी राजनीती मधील त्यांच्या सर्वोत्तम निर्णयांचा काळ बनवून दाखवला. अटलजी ४ वेगवेगळ्या प्रदेशांमधून सांसद म्हणून निवडण्यात आले होते, त्यात उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,गुजरात व दिल्ली अशा ठिकाणांहून त्यांची निवड झाली होती. अशाच या सर्वांच्या लाडक्या अटलजी बद्दल आपण काही अशी माहिती जाणून घेणार आहोत जे त्यांना सर्वोत्तम पंतप्रधान म्हणण्यास भाग पाडते.

  • इ.स. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भा.ज.पा. सरकार निवडून आले आणि त्यात अटलजींना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले परंतु इतर राजनीतिक पार्टीचा पाठिंबा भेटला नाही म्हणून भा.ज.पा. सरकार पडले आणि अटलजींना १३ दिवसातच राजीनामा द्यावा लागला.
  • त्यानंतर इ.स.१९९६ ते १९९८ च्या दरम्यान यांची सरकार परत सत्तेवर आले परंतु यावेळेसही पाठिंबा नसल्या कारणाने माघार घेण्यात आली. त्यानंतर भा.ज.पा. ने इतर पार्टींना सोबत घेऊन NDA (नॅशनल डोमेस्टिक पार्टी) ची स्थापना केली. परंतु हे सरकार देखील फक्त १३ महिने सत्तेवर राहू शकले.
  • सत्तेवर आल्यानंतर अटलजी व भा.ज.पा. सरकार ने मे १९९८ मध्ये राजस्थान मधील पोखरण येथे ५ अंडरग्राऊंड न्यूक्लिअर टेस्ट पूर्ण केले. सर्व टेस्ट यशस्वी ठरल्या ज्याची चर्चा देशात व विदेशात होऊ लागली.
  • इ.स. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात अटलजींनी घेतलेले निर्णय त्यांच्या पुढील वाटचाली साठी व भारतासाठी देखील महत्वाचे ठरले. या कारगिल युद्धातील विजयामुळे जनतेमध्ये अटलजी यांची एक चांगला नेता म्हणून ओळख निर्माण झाली.
  • पुढील पाच वर्षात भा.ज.पा. हि पहिली नॉन काँग्रेस पार्टी बनली. अटलजींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याकरिता सर्वप्रथम नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हाती घेतले.
  • इ.स. २००१ मध्ये अटलजींनी ‘सर्व शिक्षण अभियान‘ सुरु केले.
  • इ.स. २००४ मध्ये जेंव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर आले तेंव्हा अटलजींनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
  • इ.स.२००५ मध्ये अटलजींनी आपल्या राजीनीतिक कारकिर्दीतून राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही.

अटलजींना त्यांच्या संपूर्ण कालकिर्दीमधे त्यांना ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांची नावे खालील प्रमाणे:

१. इ.स. १९९२ – पद्मविभूषण पुरस्कार

२. इ.स. १९९४ – लोकमान्य टिळक पुरस्कार

३. इ.स. १९९४ – बेस्ट सांसद पुरस्कार

४. इ.स. १९९४ – पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार

५. इ.स. २०१४ – भारतरत्न पुरस्कार

अशा या लोकप्रिय पंतप्रधान अटलजी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी AIIMS येथे दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.