भारतीय रुपया सध्या तणावात असून तो टिकण्यासाठी झुंज देतोय. आता पर्यंतच्या निच्चांकी किंमतीवर तो सध्या पोहचला आहे आणि सातत्याने रुपयाची किंमत कमी होत आहे.

सध्या 1 डॉलर =70.82 रुपये एवढी किंमत कमी झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने रूपयाची किंमत ढासाळत चालली आहे. रूपयाची किंमत ढासाळण्याची बरीच कारणे आहेत.

सध्या रुपया या चलनाची मागणी जागतिक बाजारात कमी झाली आहे. चलनाची मागणी कमी झाली की त्याची किंमत सुद्धा कमी होते. आपल्याला माहीत असलं पाहिजे सध्या जी रुपयाची किंमत कमी होते आहे ती Depreciation मुळे होत आहे. सध्या रुपयाचं Devaluation केलं गेलं नाही.

Devaluation हे देशाच्या सेंट्रल बँकेकडून जाणूनबुजून केलं जातं, तर Depreciation आणि Appreciation ह्या आपोआप होणऱ्या प्रक्रिया आहेत.

■ रुपयाची मागणी कमी होण्याची कारणे –

जागतिक बाजारात डॉलरची वाढत जाणारी मागणी.

सध्या डॉलरची मागणी का वाढतेय तर त्याच उत्तर अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने जाहीर केलेले वित्तीय धोरण, हे आहे. अमेरिकेच्या बँकेने व्याज दर वाढवले आहेत, त्यामुळे जास्त व्याज आणि फायदा मिळावा यासाठी जगात डॉलरची मागणी खूप वाढली आहे. व्याज दर वाढवल्यामुळे बरेच गुंतवणूकदार आपली बाहेरच्या दुसऱ्या देशातील गुंतवणूक काढून अमेरिकेत ती गुंतवणूक करत आहेत.

परकीय संस्थात्मक गुंतवणुकीच्या(FII) निचऱ्यातील वाढ.

परकीय संस्थात्मक गुंतवणुकीतील निचरा हा तुर्कस्थानीतील आर्थिक संकटाच्या परिणामामुळे आणि डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे होतोय. डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे परकीय संस्था आपला भारतातील पैसा काढून घेऊन अमेरिकेत गुंतवण्याच्या हेतूमूळे हा FII निचरा होतोय.

जागतिक तेल व्यापारात तेलाच्या वाढणाऱ्या किमती.

OPEC राष्ट्रांनी Tight Output Control या धोरणाचा स्वीकार केल्याने तेलाच्या पुरवठ्यावर मर्यादा आली आहे. OPEC राष्ट्र म्हणजे तेल पुरवठा करणारे राष्ट्र .त्यामुळे मागणी तेवढीच असताना पुरवठा मात्र कमी झाला आणि त्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या.

तुर्कस्तानात आलेलं आर्थिक संकट.

तुर्कस्थानातील गुंतवणूकधारांनी तुर्कस्थानातुन आपली गुंतवणूक काढून घेतली आणि ती गुंतवणूक अमेरिकेत केली. कारण अमेरिकेने व्याज दर वाढवले असून जास्त नफ्याच्या आशेने तुर्कस्थानातुन गुंतवणूक काढून अमेरिकेत केली जात आहे. तुर्कस्तान आणि अमेरिकेचे समंध थोडे बिघडले असल्यामुळे अमेरिकेने हे जाणूनबुजून करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकेची इराण- अमेरिका न्यूक्लीअर डील मधून माघार

गेल्याच महिन्यात अमेरिकेने इराण-अमेरिका न्यूक्लीअर डील मधून माघार घेतली. त्यामुळे इराण वर अनेक आर्थिक बंधन लादली गेली त्यामुळे इराण कडून मिळणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात कमी झाली आणि तेलाच्या किंमती वाढल्या. या सर्व कारणांमुळे रुपयाची किंमत पडली आणि त्या तुलनेत डॉलर मात्र वधारला गेला.

आपण अशा करूया कि रुपयाची परस्थिती लवकरच सुधरेल, तुमचे विचार कमेंट करायला विसरू नका.