आपल्या सर्वानाच आपल्या महाराष्ट्रावर गर्व आहे परंतु कधी त्यामागचे कारण आपण येथे पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्य आपल्या नावातच याची खासियत स्पष्ट करतो, संस्कृतमध्ये महा म्हणजे ‘महान’ आणि राष्ट्र म्हणजे ‘राज्य’ असे होते, अशा या महान राज्यात आपण राहतो आणि येथे जन्माला आलो याचा आपणास गर्व असणे तर साहजिक आहे. आज आपण आपल्या आपल्या राज्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

१. भारतामध्ये सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या राज्यामध्ये दुसरा व क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा येतो. याचे एकूण क्षेत्रफळ 307,713 km2 आहे.

२. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहायला गेले तर महाराष्ट्र हा युके, न्यूझिलॅंड, कतार, इटली, क्युबा अशा बऱ्याच देशांपेक्षा मोठा आहे.

३. सुमारे 52,000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील लोणार या गावात उल्कापात झाला आणि खाऱ्या पाण्याचे सरोवर निर्माण झाले. हे सरोवर जवळपास 150 m खोल व 1.8 km रुंद आहे.

४. शनिशिंगणापूर हे एकमेव असे गाव आहे कि तेथील घरांना दरवाजे नाहीत.तेथील गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे कि जो कोणी चोरी करेल त्याला देव शिक्षा करेल.

५. भारतातील पहिली रेल्वे हि महाराष्ट्रामध्ये मुंबई ते ठाणे धावली होती.ती आशिया खंडातील सुद्धा पहिली रेल्वे होती.

६. महाराष्ट्राला 720 km इतकी समुद्र किनारपट्टी लाभली आहे.

७. महाराष्ट्रामध्ये एकूण 24 विद्यापीठे आहेत आणि त्यापैकी मुंबई विद्यापीठ हे पदवीधारकांच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.

८. महाराष्ट्रामध्ये एकूण 350 किल्ले आहेत त्यापैकी सर्वात जास्त किल्ले हे शिवाजी महाराजांनी बांधले आहेत.

९. महाराष्ट्रातील अजंठा,एल्लोरा,कान्हेरी अशा बऱ्याच ठिकाणी पुरातन लेण्या आहेत.

१०. महाराष्ट्र राज्याची मुळात स्थापना हि १ मे १९६० रोजी करण्यात आली.मुंबई हि या राज्याची राजधानी आणि मराठी हि राज्य भाषा म्हणून घोषित करण्यात आली.

तुमच्या कडे पण आपल्या राज्याबाबतीत काही मनोरंजक तथ्य असतील तर नक्की कमेंट करा!