• मराठी माणसाला मांसाहार म्हंटल कि सर्वप्रथम आठवतो तो रविवार आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा. 
  • पण कधी विचार केला आहे का कि जागतिक स्थरावर मांसाहाराला कश्या प्रकारे पाहिलं जात ते? मांसाहार हा पर्यावरण,अर्थकारणाशी कसा निगडित आहे ते? मांसाहाराला प्रयेक संस्कृती मध्ये स्थान दिलेले आहे.काहींनी त्याला वैध ठरवले तर काहींनी नाकारले. 
  • सध्याच्या स्थितीत मांसाहार हा उच्च आर्थिक स्थिती आणि जीवनशैली  दर्शवण्याचे साधन झाले आहे.पुढे वाचून तुम्हाला कळेल कि जास्त मांसभक्षण करणारे देश हे आर्थिक दृष्टया सुधारलेले आहेत.तसेच पाककृती सुद्धा यात मोठी भूमिका बजावते.तसेच शेती आणि पशुपालन याचा हि परिणाम मांसाहारी खाण्यात होतो. 
  • मांसाहार म्हणजे फक्त चिकन आणि मटण  नवे तर त्यात बीफ, पोर्क आणि इतर सर्व प्राणी, पक्षी येतात जे मानवाकडून भक्षण केले जातात. 

आज आपण या आर्टिकल मध्ये हेच पाहणार आहोत कि,

  1. कोणते देश किती मांसभक्षण करतात? आणि का?
  2. भारत आणि मांसाहार
  3. मांसाहार आणि त्याचे पर्यावरणावरील परिणाम
  4. मांसाहार चांगला कि वाईट 

चला तर मग वेळ न घालवता सुरु करूयात. 

१. कोणते देश किती मांसभक्षण करतात? आणि का?

१. ऑस्ट्रेलिया-

दक्षिणी गोलार्धातील हा देश आपल्या उत्तम प्रकारे व्यवस्थापित पशुपालना मुळे  जगात प्रसिद्ध आहे आणि बहुदा हेच कारण आहे कि या देशात सर्वात जास्त मांसाहार केला जातो. प्रति मनुष्य २०५ पौंड्स वार्षिक मांसाहार येथे होतो. याचे श्रेय तेथील उत्तम प्रकारची प्रगत शेती, पशुपालन आणि आर्थिक प्रगतीला देता येईल. 

२. युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका – 

प्रगत देश आणि यू.एस.ए नाही हे कसे होऊ शकते. मांसाहाराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर हा देश येतो. येथील प्रगत आर्थिक समाज हा मांसाहाराला प्राधान्य देतो. प्रत्येक जेवणात एक प्रोटीन चा स्रोत म्हणून मांसाहार सेवन केले जाते. या देशातील लोक २००. प्रति मनुष्य से मांसाहार सेवन करतात. 

३. इस्राईल –

हा देश प्रति मनुष्य प्रति वर्ष १८९. ६ इतके मास भक्षण करतो. हे सुद्धा एक प्रगत राष्ट्र आहे. महत्वाची बाब म्हणजे येथील सरकार लोकांना मांसाहार साठी प्रोत्साहित करताना दिसते. 

४. अर्जेन्टिना –

दक्षिण अमेरिका खंडामधील हा देश खनिज तेल आणि शेती यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम प्रकारचे पशुपालन हि येथे आहे. हा देश गोपालनात सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. येथे प्रति वर्षी प्रति मनुष्य १८६.७ पौंड इतके मांस भक्षण केले जाते. येथे बीफ मांस सर्वातजास्त खाल्ले जाते. आणि हि तेथील एक परंपराच आहे. 

५. उरुग्वे –

हा हि दक्षिण अमेरिका खंडातील देश मास भक्षणात अग्रेसर आहे.प्रतिमानुष्य प्रति वर्ष १८२.८ पाउंड इतके मांसभक्षण येथे होते.  

हे जागतिक स्थरावरील पाच देश आहेत जे मांसभक्षण करण्यात अग्रेसर आहे आणि त्यामागील करणे सुद्धा तुम्हाला कळाली असतील. पुढे दिलेल्या यादीत प्रथम १० देश आणि भारताचे स्थान तुम्हाला कळेल. 

क्र.              देश. प्रतिवार्षिक प्रति मनुष्य मांसाहार

 (पाउंड मध्ये) २०१३.

1. ऑस्ट्रेलिया. 205.00
2. युनायटेड स्टेट्स. 200.60
3. इस्राईल.  189.60
4. अर्जंटिना.  186.70
5. उरुग्वे.  182.80
52 भारत (शेवटून दुसरा). 4.0

२. भारत आणि मांसाहार

तुम्हाला जागतिक क्रमवारी आणि आकडेवारी मधून कळलंच असेल कि भारत जगात शेवटून दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे मांसभक्षण करण्यात. याला अनेक करने आहेत आपण ती थोडक्यात पाहुयात.

  • शेती आणि पशुपालन- भारतात समप्रमाणात शेती होत नाही. उत्तरेत बारमाही नद्यां ची खोरे असल्याने दूध दुभती जनावरांचे संगोपन नीट होते. चारा  मुबलक मिळतो. राजस्थान गुजरात महाराष्ट्राचा काहीभाग आणि मध्यप्रदेशचा काही भाग हा शुष्क प्रदेशात मोडतो आणि पशुपालनाला लागणारे पाणी आणि चार योग्याप्रमाणात उपलब्ध होत नाही हीच परिस्थिती दक्षिणेतली सुद्धा. मोठ्याप्रमाणात भारतीय शेतकरी हे पशुपालन दूध आणि अन्य कारणासाठी करतात आणि मांस उत्पादनासाठी पाहू पालन हे कमीच केले जाते. याला अनेक सांस्कृतिक करणे सुद्धा आहेत. 
  • सांस्कृतिक घटक – भारत हि अनेक मोठ्या धर्मांची जन्मभूमी मानली जाते आणि बऱ्यापैकी सर्व धर्मानी अहिंसेची शिकवण जगाला दिलेली आहे. काही धर्मात पूर्ण पणे तर काही धर्मात थोड्याप्रमाणात मांसभक्षण करण्यास परवानगी नाकारली आहे. उदाहरणार्थ – जैन धर्मात मांसभक्षण नाकारले आहे. हिंदुधर्मात काही लोक पूर्णपणे शाकाहारी आणि काही लोक आवडीनुसार मांसाहार भक्षण करताना दिसतात. तसेच दिवस, श्रावण महिना, आणि उस्तवाचे दिवस हे मांसभक्षणासाठी नाकारण्यात येतात. दुभत्या पशूंना देव मानणारी संस्कृती असल्याने त्यांचे भक्षण होत नाही आणि मांसभक्षणासाठी मटण, चिकन हे मोठ्या प्रमाणात स्वीकारलेले पर्याय दिसून येतात. 
  • आर्थिक परिस्थिती – भारत हा विकसनशील देश आहे. अनेक लोक दारिद्र रेषेखालील आयुष्य जगतात. याच परिस्थितीत मांसभक्षण हा एक महागडा आहार आहे. या कारणास्तव भारतीय समाजातील मोठा भाग हा मांसाहाराकडे पाठ फिरवतो. 
  • वैद्यकीय करणे – भारतात लठ्ठपणा हा आजार दिवसोंदिवस वाढताना दिसतो. भारताला डायबेटीस कॅपिटल असे हि म्हणतात तसेच हृदय विकारामुळे अनेकांचे प्राण जातात. याचे महत्वाचे कारण म्हणजे खाण्यातील असमतोल. असे मानले जाते कि मांसाहार केल्याने शरीरात जास्त कॅलोरीज मुळे चरबी वाढते अणे लठ्ठपणा येतो.  

मांसाहार वाढावा यासाठी भारत देश हा अनेक प्रयत्न करत आहे जसे अंडी खाण्यास प्राधान्य देणाऱ्या जाहिराती इत्यादी. याचे कारण असे कि  जागतिक कुपोषणाच्या आकडेवारीत ( Global Hunger Index ) भारत हा ११९ पैकी १०३ या स्थानावर  आहे जे कि सर्वात वाईट आहे. भारतीय लोकांच्या आहारात  प्रोटीन चे प्रमाण वाढावे या साठी सरकार प्रयत्नशील आहे . 

meat consumption

३. मांसाहार आणि त्याचे पर्यावरणावरील परिणाम

वैद्यकीय कारण तर आपण पहिलेच आहे पण मांसाहाराचा सर्वात जास्त फटका हा पर्यावरणाला बसलेला दिसून येतो. पशुपालनाच्या पाण्याचा मोठयाप्रमाणात अपव्यय होतो. मीट इंडसस्ट्री मधील सांडपाणी जलप्रवाहात सोडल्याने पाण्यातील जैवविविधते चा ऱ्हास होतो. तसेच प्राण्यांपासून मिथेन हा वायू बाहेर फेकला जातो जो जागतिक तापमानवाढीस मोठ्याप्रमाणात कारणीभूत आहे. पाळीवप्राण्यांमुळे जैवविविधता धोक्यात येते. उदाहरणार्थ वाढते पशुपालनामुळे चाऱ्याची गरज वाढते आणि लोक जनावरांना चरण्यासाठी जंगलात नेतात, तेथील दुर्मिळ वनस्पती जनावरे खातात तसेच पाळीवप्राण्यांचे  रोग हे जंगली प्राण्यांना होतात.

४. मांसाहार चांगला कि वाईट

मांसाहार चांगला कि वाईट हा मुळात प्रश्नच चुकीचा आहे. मुळात म्हणजे प्रत्येक मनुष्य हा स्वतः च्या आवडीने हे ठरवत असतो कि त्याचा आहार कोणता असणार. जर मांसाहार हा मांकांद्वारे केला तर तो अधिक उपयुक्त ठरू शकतो.

जसेकी सुदृढ मनुष्याला दिवसाला ७०-७५ ग्राम प्रोटीन लागते आणि एका अंड्यातून ५ ग्राम प्रोटीन मिळते, चिकन चेस्ट मध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन असते, फिश आणि बीफ मध्ये इसेन्शिअल अथवा गरजेचे फॅट असते. सर्व लक्षात घेऊन जर मांसाहार केला तर सुधृढ होण्यास मदत तर करेलच आणि पर्यावरण रक्षणास हि मदत होईल कारण प्रत्येक देश लागेल तेवढेच आणि एक्स्पोर्ट करण्याइतकेच उत्पादन घेईल. आणि भारत संदर्भात बोलायचे झाले तर संविधानाने कलाम- १४ समतेचा अधिकार दिला आहे यात कोनाही एखाद्याच्या खाण्याच्या सवयीनवरून दुजाभाव करू शकत नाही. 

आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. अशीच माहिती मराठी मधून मिळवण्या साठी आमच्या ब्लॉग वर येत राहा. तुम्हाला काही सूचना, प्रश्न, अभिप्राय असतील तर कृपया खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.