आपल्याला माहीत आहे की ‘पाणी हेच जीवन‘ आहे. पण ते पाणी प्रमाणत असेल तरच जीवन स्वस्थ आहे. तुमचे शरीर जवळपास 50-60 % पाण्यानी व्यापलेले आहे. तुमच्या शरीरातील स्नायूंना, स्नायुतील उतींना आणि ऊती मधील लहान लहान पेशी पर्यंत पोषक द्रव्य आणि ऑक्सिजन घेऊन जाण्याचं काम रक्तातील पाण्यामुळेच शक्य आहे.

सर्वांना माहिती आहे की दिवसातून कमीतकमी 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे, हे एक योग्य प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा कमी पाणी पिल्याने हानिकारक विकार होतात. परंतु हे प्रमाणातील पाणी सुद्धा तुम्ही कसे पिता म्हणजे उभं राहून पिता का बसून पिता, का झोपून पिता याचा सुद्धा तुमच्या शरीरावर गंभीर परिमाण होत असतो.

आपल्यातील बहुतेक जण उभं राहून पाणी पितात, त्यांना ती सवयच लागली आहे. उभं राहून पाणी पिल्याने तुमच्या शरीराला गंभीर दुखापती होण्याच्या शक्यता आहेत.

जाणून घेऊया उभं राहून पाणी पिल्याचे नुकसान :-

  • आयुर्वेद सांगते की उभं राहून पाणी कधीच पिऊ नये. तसे केल्याने आपण पित असलेले पाणी मोठ्या वेगाने आणि दबावाने अन्ननलिकेवाटे पोटात उतरते. त्यामुळे पचन क्रियेवर पाण्याच्या दबावाचा वाईट परिणाम होतो. उभं राहून पाणी पिल्याने आतील भागात पाणी ज्या पद्धतीने वितरित होणे गरजेचे आहे त्या पद्धतीने होत नाही.
  • उभं राहून पाणी पिल्याने तुमच्या अन्ननलिकेला चिकटलेली जी काही इम्प्युरीटी आहे ती थेट पाण्याच्या प्रेशरमुळे पोटात उतरते आणि तिथून किडनी मध्ये जाते आणि त्या इम्प्युरीटी मुळे किडनीचे नुकसान होऊ शकते.
  • पाणी पिण्याच्या पद्धतीचा तुमच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तुम्हाला सांधेदुखी, वातीचा त्रास उद्भवू शकतो.
  • उभं राहून पाणी पिल्याने तुम्हाला फुप्फुसाचा त्रास ही होऊ शकतो कारण जेंव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता तेंव्हा तुमची अन्ननलिका आणि वायुनलीका दोन्ही बंद होतात. जर तुम्ही नेहमी उभं राहून पाणी पीत असाल तर त्याचा फुप्फुसावर वाईट परिणाम होतो आणि त्याच बरोबर हृदय विकार होण्याच्या संभावना वाढतात.
  • तुम्ही उभं राहून पाणी पिल्यावर बघितला असाल की तुमची तहान व्यवस्थित भागली गेली नाही आणि त्यामुळे तुम्हाला लगेच काही वेळात तहान लागते. त्यामुळे तुमच्यासाठी उत्तम असेल की तुम्ही व्यवस्थित बसून पाणी प्या.
  • तुम्ही जेंव्हा बसता तेंव्हा तुमच्या शरीरातील स्नायू आणि पेशा या रिलॅक्स असतात. त्यामुळे पिलेले पाणी शरीरात व्यवस्थित वितरित होते आणि पिताना लक्ष असू द्या की पाण्याचा प्रवाह सावकाश आणि बारीक राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here