प्लॅस्टिक हे आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असते असे आपण रोजच ऐकत असतो आणि तरीही आपण बिंदास पणे प्लॅस्टिक बॉटल मधून पाणी पित असतो. प्लॅस्टिक बॉटल मधून पाणी पिणे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आपण बाहेर पडताना बऱ्याचदा पाण्याची बॉटल सोबत घेतो पण हि बॉटल प्लॅस्टिक पासून बनविलेली असते. या पाणी बॉटल प्लॅस्टिक पासून बनविलेल्या असतात आणि या प्लॅस्टिक ची गुणवत्ता हि कमी दर्जाची असल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बाजारात सहजपणे विकत मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या बॉटल मधील पाणी आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते कारण या बॉटल्स कमी दर्जाच्या मटेरियल पासून बनविलेल्या असल्याने त्यातील पाणी पिण्यायोग्य नसते. प्लॅस्टिक पाणी बॉटल हि सूर्यप्रकाश,उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यावर त्यातून विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि ते त्या पाण्यास दूषित बनवीत असतात म्हणून ते पाणी पिणे चांगले नसते. मिनरल वॉटरची बॉटल तुम्ही विकत घेतल्यावर ती बॉटल परत पाणी पिण्यास वापरू नये आणि त्याबाबत त्या बॉटल वर सूचना सुद्धा दिलेल्या असतात, कि बॉटल चा उपयोग झाल्यानंतर बॉटल क्रश करावी. आपण प्लॅस्टिक ऐवजी काचेची, तांबा किंवा स्टेनलेस स्टील या बॉटल्स चा उपयोग करू शकतो. या बॉटल्स आपल्या शरीरास हानी पोहचविणार नाहीत.