भारताने आता भारतीय बनावटीचे अँटी न्यूक्लीअर मेडिकल किट तयार केले आहे, यापूर्वी आपण अमेरिका आणि रशिया या दोन देशांकडून अशा किट आयात करत होता. परंतु आता भारताने ते स्वतः बनवले आहे त्यामुळे आता या दोन देशांवर अवलंबून राहण्याची भारताला काहीच गरज नाही.

भारताच्या INMAS या Defence Research and Development Organisation(DRDO)च्या प्रयोगशाळेने हे मेडिकल किट तयार केले आहे. INMAS म्हणजे Institute of Nuclear Medicine and Allied Sciences, New Delhi. ही प्रयोगशाळा 1961 मध्ये स्थापली गेली होती. या प्रयोगशाळेत न्यूक्लीअर औषधांवर संशोधन व्हायचं. न्यूक्लीअर अपघातानंतर रेडीएशन लीक झाल्यानंतर त्याला कसं सामोरं जायचं यांवर ही प्रयोगशाळा काम करते.

■ अँटी न्यूक्लीअर किट बद्दल माहिती –

 • या किटला बनवण्यासाठी भारताला म्हणजेच INMAS ला 20 वर्षांचा कालावधी लागला.
 • या किट मध्ये 25 वेगवेगळ्या वस्तू आणि औषधं आहेत. यात रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटेक्टर्स आहेत जे शरीरातील 80-90% रेडिएशन शोषुन घेतात. यात नर्व्ह गॅस अजेंट, बँडेज, गोळ्या आणि औषध जे रेडिएशन शोषून घेतात त्यांचा समावेश आहे.
 • हे किट लष्कराला, पॅरामिलिटरीला, पोलीस फोर्स यांच्या साठी बनवण्यात आली आहे कारण या रेडिएशनला सामोरे जाणारे हे पहिले व्यक्ती असतात.

■ किटमधील काही महत्वाच्या औषधांची यादी –

 1. Prussian Blue Tablet – रेडिओ सिजियम (Cs-137) आणि रेडिओ थेलीयम यांच्यासाठी हे औषध खूपच परिणामकारक आहे
 2. Ethylenediaminetetraacetic acid
 3. Ca-EDTA श्वसन द्रव्य
 4. रेडिओ ऍक्टिव्ह ब्लड मॅपिंग ड्रेसिंग
 5. रेडिओ ऍक्टिव्ह लघवी/ जैवद्रव्य कलेक्टर
 6. अँटी गामा किरण त्वचा संरक्षक
 7. Amifostine injection
 8. Indranil 150 mg टॅबलेट.

असे मेडिकल किट फक्त सैनिकच नाही तर सामान्य नागरिकांना सुद्धा वाचवतील यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here