• अगदी पूर्वी पासून मानव इतिहासात खाद्य गोठून नंतर खाण्याची परंपरा दिसून येते. अगदी उत्तरेतील आर्टिक मध्ये राहण्याऱ्या जमाती जसे Chukchi आणि Sami जमाती या व्हेल माश्याची शिकार करून बर्फात गाडून ठेवतात आणि लागेल तसे वर्षभर ग्रहण करतात. मानवाच्या इतिहासातील जिवंत राहण्यासाठी चे हे एक skill आहे. 
  • नॉर्वे या देशाच्या उत्तरेला Global Seed Vault बनवलेले आहे. या मध्ये जगातील महत्वपूर्ण अन्नधान्ये Cryogenic तापमानाला(-१५० डिग्री सेल्सियस) साठवण्यात आले आहेत. जेणेकरून जर कोणते पीक नष्ट झाले तर पुढील पिढीसाठी धान्य उत्पादनासाठी बिया उपलब्ध असतील. 

सध्याच्या परिस्थितीत आपण घरातील अथवा दुकानातील फ्रीझर मध्ये गोठवलेले फूड घेतो. काही लोकांना ते फ्रेश वाटते तर काहींना Unhealthy. आज या आर्टिकल च्या माध्यमातून फ्रोझन फूड बद्दल च्या महत्वाच्या बाबी समजून घेणार आहोत. 

या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?

  1. फ्रीझ फूड म्हणजे काय?
  2. फ्रोझन फूड मध्ये नक्की काय होते?
  3. पर्यावरणासाठी चांगले आहे.
  4. डाएट प्लॅन करण्यास प्रोस्थाहन भेटते.
  5. रिफ्रेशिंग असते.
  6. फ्रोझन फूड आपल्या घरातील रेफ्रिजरेटर मध्ये किती दिवस चांगले राहू शकतात?

 चला तर मग चालू करूयात, 

 

फ्रीझ फूड म्हणजे काय?

 

कोणतेही फूड जसे Cooked किंवा Raw तुम्ही गोठवून ठेवले आणि गरज लागेल तसे ग्रहण केले तर ते फ्रीझ फूड म्हटले जाते. आता सर्वच फूड हे समप्रमाणात फ्रीझ होत नाहीत. जसे Mayonnaise, Lettuce  यांची टेस्ट बदलते. मटण, माशे, चिकन इत्यादी पदार्थ हे अगदी आहे तसे साठवले जाऊ शकतात. मात्र यांना जर cook केले तर यांच्यामधील बरेचसे Moisture निघून जाते आणि योग्य प्रमाणात फ्रीझ होत नाहीत. 

 

फ्रोझन फूड मध्ये नक्की काय होते?

 

जर तुम्ही कायम “0” डिग्री वर अन्न Store केले तर ते अनेक वर्ष टिकते. अतिथंड तापमानामुळे अन्नाच्या आतील Molecules हे खूप Slow होतात या मुळे त्यातील Microbes हे निष्क्रिय अवस्थेत पोहोचतात. यात Microorganisms, Bacteria, Yeast ची Growth थांबते. या मुळेच ऍन हे Non perishable किंवा अनाशवंत बनते. 

येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, काही Nutrients हे फ्रीझिंग मुळे नष्ट होतात. जसे, व्हिटॅमिन-C आणि B(विशेष करून थायमिन) हे दोन्ही पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहेत. तसेच जे फॅट मध्ये विरघळतात असे A आणि E सुद्धा कमी होतात. मिनरल्स, फायबर्स आणि साखर आहे तसे फ्रेश राहतात. 

 

पर्यावरणासाठी चांगले आहे?

 

फ्रोझन फूड विकत घेतल्याने खाद्यान्नाच वेस्टेज कमी होते. जसे बाजारातून भाजी, फळे आणल्यास ती काही काळात खराब होते या साठी तुम्ही खाणार अथवा खराब झाली कि फेकून देणार. फ्रोझन फूड तुम्ही लागेल तेवढं वापरू शकता. म्हणजे यात तुमचे पैसे सुद्धा वाचत आहेत आणि अन्न सुद्धा. तसेच बाजारात सारखे जावे लागणार नाही. Fuel आणि वेळ दोनीही वाचेल. तुम्ही नकळतच तुमच्याकडून वाढणारे कार्बन फूटप्रिंट कमी कराल. Eco Friendly आहे. 

 

डाएट प्लॅन करण्यास प्रोस्थाहन भेटते

 

Store फूड मुळे तुम्ही तुमच्या फूड ला ओळखता. तुम्हाला आवधीच्या भाज्या आणि फळे फ्रीझ मध्ये उपलब्ध असल्याने तुम्हाला तुमचा डाएट प्लॅन करण्यास प्रोस्थाहन भेटते. Lifestyle healthy होते. फळे, भाज्या Store करताना एक गोस्ट लक्षात ठेवा कि साठवणूक करताना पूर्ण हवा बाहेर काढून  एअर टाईट भांडी अथवा झिप लॉक च्या पिशव्या वापरा. यामुळे Extra moisture निघून जाईल आणि फूड बराच काळ ताजे राहील.  

 

रिफ्रेशिंग असते!

 

हे एक मानसिक कारण आहे. आपण उन्हाळ्यात आईस्कीम खाऊन आनंदी होतो. कारण आपल्याला ती चव आणि थंडावा हवा असतो. फूड च्या बाबतीत सुद्धा तेच आहे. Season नसताना जर तुम्हाला आंबे, Strawberries, जांभूळ अशी फळे अथवा पल्प भेटला आणि टेस्ट, Nutrition, Quality सुद्धा Same तर एकप्रकारे रिफ्रेशिंग असते. त्यामुळे असे म्हणतात कि फ्रोझन फूड डिप्रेशन, Anxiety आणि Sadness कमी करण्यात मदत करते. 

 

फ्रोझन फूड आपल्या घरातील रेफ्रिजरेटर मध्ये किती दिवस चांगले राहू शकतात?

 

(“0” डिग्री फॅरनहाइट.)

घटक  महिने
सॉसेजेस  1-2
अंडी  12
रस्सा, मटण  2-3
न शिजवलेले मास  4-12
शिजवलेले मास  2-3
सूप  2-3
शिकार न शिजवलेली  8-12

आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले, तुमचे अभिप्राय, प्रश आम्हाला खाली दिलेल्या कंमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा. मराठी मधून अशी इंटरेस्टिंग माहिती मिळवण्या साठी आमच्या ब्लॉग ला भेट देत राहा.