अवघ्या काही दिवसातच श्रावण आपल्या दाराशी येऊन थांबला आहे ” श्रावण मासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे ” या बाल कवितेत सगळ्यांचेच लहानपण गेले आहे. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे.

यामहिन्यात नॉनव्हेज तर बंद असतंच, पण अनेकजण श्रावणी सोमवार फार श्रद्धेने पाळतात. उपवास हा पण श्रद्धेचाच भाग झाला. हा उपवास कधीकधी शरीराला फार घातक ठरतो आणि याचे परिणाम पोटात जळजळ, ऍसिडिटी होणे, पोटदुखी, डोकेदुखी, शरीरातले त्राण जाणे इत्यादी असे शरीराला हानिकारक परिणाम होऊ शकतात. पण आरोग्याला सांभाळून ते कसे पाळावे यातच चतुराई. फार काही नाही पण उपवास करताना काही साध्या गोष्टी पाळायला हव्यात.

1. उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल ?

 • सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना उकळलेले पाणी प्यावे. फ्रीजचं, माठाचं पाणी टाळा.
 • फिरायला जाण्यापुर्वी ग्लासभर कोमट पाणी आणि आल्यानंतर बिनसाखरेचे १ कप लेमन टी पिऊ शकता.
 • सकाळी तासभर ५-६ किमी भराभर चाला
 • दिवसातून दोन वेळाच जेवण करणार असाल तर सकाळी ८ ते ११ यावेळेत व संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत जेवणे हितकारी आहे.
 • दोन जेवणाच्या दरम्यान १-२ वेळा बिनसाखरेचे लेमन टी/ डिकासिन/ चहा/ कॉफी/ दुध-हळद/ लिंबूपाणी/ गवती चहा काढा पिऊ शकता.

2. उपवास करताना सकाळचे खानपान:

 • २-३ केळी
 • २-३ सफरचंद
 • २-३ राजगिरा लाडू व एक ग्लास सुंठ-हळदीचे बिनसाखरेचे दुध
 • १ राजगिरा पोळी व १ वाटी उपवासाच्या भाज्या.
 • १-२ ग्लास ताज्या दह्याचे ताजे ताक

3. उपवास करताना दुपारचे खानपान:

 • वरीचे तांदूळ + दाण्याची आमटी + एक चमचा घरी बनविलेले तूप
 • १-२ मध्यम वाटी गूळ घालून बनविलेले नारळीभात
 • रताळाचा कीस
 • १ वाटी दही व खिसलेल्या २ काकड्या यांची कोशिंबीर

4. उपवास करताना संध्याकाळचे खानपान:

 • १ पालेभाज्यांचे थालीपीठ व २ वाटी ताकाची कढी
 • १ -२ प्लेट हिरव्या मुगाची वाफविलेली उसळ
 • १ ज्वारीची पातळ भाकरी व १ वाटी पिठल
 • १-२ डाळिंब किंवा १-२ नारळ पाणी

हे पदार्थ आलटून-पालटून सेवन केल्यास शरीराला फार उपयुक्त आणि आरोग्यमय ठरेल. तर मग लागा कामाला, आणि करा श्रावणाची तयारी आरोग्याला जपूनी.