स्वयंपाक घरातील भांडी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी चमचा सुद्धा पाठ असतो. बाजारात नवीन प्रकारची भांडी आली कि घ्यायची घाई सुद्धा असते. पण Scinitfically कधी विचार केला आहे का कि ज्यात आपण अन्न बनवतो, खातो ते आपल्या शरीरावर कश्या प्रकारचे संस्कार करतात? आज तुम्हाला याचीच माहिती भेटणार आहे. 

  • काळानुसार स्वयंपाकातील भांडी बदललेली दिसतात. अगदी १२०० इसा.पूर्व मधील हडप्पा संस्कृती मधील लाल आणि काळ्या भांड्यांमुळे त्या संस्कृतीला “Black and Red ware culture” असे ओळखले गेले. ६००-२०० इसा.पूर्व  मध्ये जेव्हा महाजन पदांचा काळ सुरु होता. मगध, कशी, गांधार अवंती इत्यादी महाजन पदांच्या काळाला “Northern-black polished ware culture” असे म्हटले गेले. यावरून आपल्याला स्वयंपाक घरातील भांडी आणि मानवी जीवन किती निगडित आहे हे समजण्यास मदत होते. 
  • काळ जसा बदलेल तसे Culture बदलते. आर्य Culture मध्ये भाजलेल्या मातीच्या  भांड्याना प्राधान्य दिले, नंतर तांबे, लोखंड, पितळ, अल्लुमिनियम, ग्लास इत्यादी प्रकारची भांडी क्रमाने आली. आयुर्वेदा मध्ये या बाबतीत संक्षिप्त वर्णन दिलेले आहे. आयुर्वेदा नुसार धातू ची भांडी मानवी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात आणि तुमच्या आरोग्यावर पॉसिटीव्ह परिणाम करतात. या आर्टिकल मध्ये आपण हि भांडी आपल्या शरीरावर कश्या प्रकारे परिणाम करतात हे पाहणार आहोत .  

चला तर मग सुरु करूयात,

तांब्याची भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

आयुर्वेदात तांब्याला Anti-bacterial धातू म्हणले आहे. या कारणा मुळे तांबे या धातू मधील पाणी पिल्यास आपले चयापचन सुधारते, यात Antioxidant properties असतात, अंगावरील आणि शरीराच्या आतील घाव भरून निघण्यास मदत होते, Hemoglobin वाढवण्यात मदत करते. भात शिजवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. आता तुम्हाला कळले असेल कि याचे महत्व काय मात्र एक गोस्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ताभ्यां च्या भांड्या मधून काही Acidic खाल्ले अथवा पिले तर त्या घटकाची चव बदलू शकते. 

चांदी ची भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

चांदी हा एक Precious metal  आहे. तसेच Antibacterial सोबत Antimicrobial सुद्धा आहे. या धातू चे नेसर्गिक गुणधर्म हे थंड आहेत. पित्त प्रवृत्ती च्या लोकांना या धातूच्या भांड्याचा फायदा होतो. चांदी च्या भांड्यांमधून खाल्ले अथवा पिले तर शरीराचे तापमान  कमी होतेच आणि तुमच्या त्वचे साठी सुद्धा हे अत्यंत गुणकारी आहे.

पितळी भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

गावाकडे अथवा जुन्या लोकांच्या घरात आपण एकदातरी पितळी भांडी पहिलीच असणार. कणग्या, डबे, देवपूजेसाठी लागणारी भांडी या मध्ये पितळी भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र स्वयंपाक घरात याचा वापर टाळावा. हि भांडी मीठ आणि Acid यांवर लगेच React करते. 

स्टेनलेस स्टील ची भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

हा एक Non reactive धातू आहे. त्यामुळे या ढळू ला स्वयंपाक घरातील Ideal धातू मानले गेले आहे. या मधून खाणे आणि पिणे अगदी Safe  असते. हा धातू Chromium, Nickel, Carbon, Silicon पासून बनतो आणि खालचा भाग उष्णते साठी तांब्याचा ठेवतात. या धातूची भांडी उत्तम मानली जातात. 

ऍल्युमिनिअम ची भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

स्वयंपाक घरातील भांड्यांचा विषय चाललंय आणि ऍल्युमिनिअम चे नाव नाही असे कसे होईल? स्वयंपाक कामामधील जगातील सर्वात आवडता धातू आहे. अन्नामध्ये या धातूचे कण मिसळत नाहीत त्या साठी Scratch-resistant भांडे घ्यावे. मात्र जे Uncoated aluminium असते ते आरेग्यासाठी हानिकारक असते. 

कास्ट आयर्न ची भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

स्वयंपाक घरातील आवडत्या भांड्यात याचा दुसरा क्रमांक लागतो. हा धातू अति उष्ण्ता सहन करतो आणि याच गुणधर्मा मुळे याचा वापर Slow cooking साठी होतो. तसेच  आयुर्वेदा नुसार गर्भवती महिलांसाठी या भांड्यामधून बनविलेल्या पालेभाज्या शरीरातील Iron चे प्रमाण वाढवतात. या भांड्यात शिजवलेले अन्न शरीरा मधील लोह कमतरतेमुळे होणाऱया आजारावर (Anemia) रामबाण उपाय आहे. मात्र हि भांडी जड असल्याने स्वच्छ करण्यास दमछाक होते. यात अन्न साठवणे हानिकारक असते कारण अन्न Acidic बनते. 

नॉन-स्टिक भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

या प्रकारचे भांडे कोणत्याही धातूपासून बनवले जाते. यावर Teflon चे आवरण चढवतात ज्या मुले वापरण्यास आणि स्वच्छ करण्यास सोप्पे असते. अनेक लोकांना वाटते कि हि भांडी आरोग्यास अत्यंत गुणकारी आहेत मात्र अनेक रिपोर्ट्स नुसार उच्च तापमानावर जर या भांड्यात भाज्या बनवल्या तर कॅन्सर चा धोका उध्दभवू शकतो . 

काचे ची भांडी  तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

काच हा धातू नाही मात्र सध्या काचेची भांडी स्वयंपाक घरात सर्रास बघायला भेटतात. काच हि Non reactive असते आणि यात तुम्ही भाज्या साठवू अथवा शिजवू करू शकता.  मात्र उच्च तापमानाला काच फुटण्याची भीती असते. हा एकच Drawback आहे. 

अश्या प्रकारे तुम्हाला स्वयंपाक घरातील धातूं विषयी माहिती भेटली. आता आपल्या घरातील तसेच हॉटेल आणि चौपाटी वरील भांडी पाहून तुम्ही सांगू शकाल कि कोणते तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि का. तर आता इथेच थांबूयात. तुम्हाला हे Article कसे वाटले, प्रश्न, सूचना, अभिप्राय खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मधून कळवू शकता. आणि अशीच उपयुक्त माहिती मराठी मधून  मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत राहा.