- तुम्ही पिळदार शरीर साठी खूप व्यायाम करत आहात पण रोज सकाळी वडापाव आणि चमचमीत मिसळ खात आहात तर ह्या जन्मी पिळदार शरीर बनवणे हे स्वप्नच राहू शकते. या आर्टिलक मध्ये तुम्हाला हे खाणे बंद करा म्हणून आम्ही सांगणार नाही तर तुम्ही या खाण्याला कशाप्रकारे खावा कि तुम्हाला तुमचे गोल्स मिळवण्यात यश भेटेल आणि या मागील काही करणे अगदी थोडक्यात सांगणार आहोत.
- आपल्या शरीराची जडण घडण हि आपण खात असलेल्या अन्ना वर अवलंबून असते. आपण ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो त्यावर आपला स्टॅमिना, आपला बौद्धिक आणि शारीरिक विकास, रोग प्रतिकारक क्षमता इत्यादी अवलंबून गोष्टी अवलंबून असतात.
- शरीरासाठी प्रत्येक ऋतुमानानुसार, भोगोलिक स्थानानुसार आणि दैनंदिन धावपळीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे अन्न लागते.
हा लेख वाचून तुम्हाला कळेल कि “डाएट” म्हणजे उपवास नसून, “आपल्या शरीराची गरज ओळखून निवडलेला आहार हा आहे”. जर तुम्ही पालक असाल तर हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या पाल्याला कोणत्या प्रकारचे अन्न कधी द्यायचे ते कळेल. जर तुम्ही वजन कमी अथवा वाढवत असाल तर तुमच्यासाठी कोणते खाणे योग्य असेल हे कळेल. पिळदार शरीरासाठी व्यायाम आणि डाएट यांचा रेशो समजून घेणे महत्वाचे आहे. यात डाएट ६०% आणि व्यायाम २०% आणि २०% झोप येते .
आजच्या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे?
- डाएट बद्दल थोडक्यात माहिती.
- महत्वाचे अन्न पदार्थ.
- काही पर्सनल टिप्स.
चला तर मग वेळ न घालवता सुरु करूयात.
डाएट बद्दल थोडक्यात माहिती
वर सांगितल्या प्रमाणे डाएट म्हणजे उपवास नाही तर तुमच्या रोजच्या जेवणाचे व्यवस्थापन आहे. आता आपल्या शरीराला दररोज लागणारे घटक म्हणजे Nutriants आणि Micro nutriants.
सर्वात महत्वाचा घटक हा Micro nutriants असतो. हे शरीराला लागणारी ऊर्जा पुरवतात. या मध्ये प्रोटीन, कार्बोहैड्रेट्स आणि फॅट यांचा समावेश होतो. या तिन्ही घटकांचा तुम्ही ज्या प्रकारे रेशो ठरवाल त्या प्रकारे तुमचे शरीर Develope होणार. आता थोडक्यात यांचे काम जाणून घेऊयात.
- प्रोटीन – हे Amino acid ची chain असते. याचे काम तुमचे Muscle मास वाढवणे हे आहे. मानवी शरीर हे १५% प्रोटीन ने बनले असते. याचे सेवन केल्याने फॅट कमी होण्यास मदत होते.
- कार्बोहायड्रेट – हे बॉडी चे Energy source आहेत. तसेच हे एक प्रकारे काही महत्वाच्या वयवांचे Fuel आहेत. आपापले शरीर या Complex energy ला एका Simple energy मध्ये Break करते आणि ग्लुकोज बनते.
(आता तुम्हाला कळले असेल कि थकल्यावर ग्लुकोन्डी का पितात.) आपल्या शरीरातील Energy ला प्रत्येक सेल पर्यंत पोचवायला इन्सुलिन वापरतात.
(खूप कार्बोहायड्रेट = अति Energy = अति इन्सुलिन = लठ्ठपणा )
- फॅट- आपल्या बॉडी मध्ये Energy store करून ठेवण्यासाठी चे एक Mechanism. फॅट हे Vitamins absorbsion साठी मदत करतात.
आता तुम्हाला एक वरवरची माहिती झाली कि तुम्ही जे खाता त्यातून तुमच्या शरीरात नक्की काय काय जाते . (या बद्दल सविस्तर पुढच्या आर्टिकल मध्ये पाहू)
American Dietary Guidelines नुसार तुमच्या शरीरात, ४०-६०% Calories या कार्बोहैड्रेट्स मधून, २०%-३५% फॅट मधून आणि १०-३५% प्रोटीन मधून याव्यात. आता आपल्या आहारात यांचे प्रमाण नियंत्रित करून आपल्याला हवी तशी Body बनवणे यालाच सोप्या भाषेत आपण डाएट म्हणू शकतो. (या बद्दल सविस्तर पुढच्या आर्टिकल मध्ये पाहू)
महत्वाचे अन्न पदार्थ
खाली काही महत्वाचे आणि Healthy फूड लिहिले आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करून एक चांगल्या प्रकारचे Healthy शरीर कमवू शकता.
फ्लॅक्स सीड्स
यात ओमेगा ३ आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते . तुम्ही याला मासे, सलाड अथवा दही यासोबत खाऊ शकता.
Beans
यात अनेक प्रकार येतात जसे घेवडा, Soya beans इत्यादी. या मध्ये सोल्युबल फायबर्स आणि प्रोटीन भरपूर असतात जे आपल्या धमन्या मध्ये साठत चाललेले Bad कोलेस्टेरॉल काढून घेतात. आणि त्यामुळे हे खाणे हृदयासाठी आणि Musscle बिल्डिंग साठी अत्यंत महत्वाचे आहे. यात एक अट अशी आहे कि हे जर भात अथवा अन्य Carb source सोबत खाल्ले तर ते शरीरात वापरले जाते (वरण भात). Beans जसे kideny beans ला Breakfast मध्ये add करणे अधिक फायदेशीर ठरेल.
Blueberries
यात सर्वात जास्त Anti oxidant असतात. हे दही अथवा सलाड सोबत खाल्यास शरीरातील Free radicals नष्ट करण्यास मदत होते आणि हे स्किन साठी फायदेशीर आहे.
Broccoli
याला सर्वात जात Healthy vegetable मानलं गेले आहे. याला कॅन्सर Fighter हि मानलं जात. यात Protein भरपूर प्रमाणात असते तसेच हि एक भाजी आहे. यात शरीराला लागणारे मिनरल्स सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात जे आपल्या मेंदू आणि हाडांसाठी महत्वाचे असतात.
ऑलिव्ह ऑइल
या तेलाला जगातील सर्वात Healthy fat मानलं जाते. हे बॅड कोलेस्टेरॉल ला कमी करते आणि Good कोलेस्टेरॉल ला वाढवते. यात मोठ्या प्रमाणात Anti oxident असतात जे आपल्या हृदयासाठी अत्यंत महत्वाचे असतात.
ग्रीन टी
यात मोठ्याप्रमाणात Anti oxident असतात जे हार्ट साठी उपयोगी असतात तसेच यात EGCG हे Compound असते जे तुमचे Metabolism (चयापचन) वाढवतात यामुळे फॅट लॉस होतो.
लो फॅट दही
आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठीच्या Calciam चा अत्यंत महत्वाचा सोर्स आहे. त्याच प्रमाणात यामध्ये प्रोटीन आणि मोठयाप्रमाणात कार्बोहैड्रेट असतात. हे Digetion सही उपयुक्त आहे.
काही पर्सनल टिप्स
तुम्हाला Micro nutrients बद्दल समजले आणि काही महत्वाचे Food सुद्धा कळले. आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही आहार ठरवू शकता जसे तुम्ही लठ्ठ असाल म्हणजे तुमच्या शरीरात फॅट जास्त आहे तर तुम्हाला फॅट आणि कार्बोहैड्रेट ला थोडे कमी करून प्रोटीन वाढवावे लागणार आणि जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला मायक्रो नुट्रीएंट्स चा क्रम ठरवून तसे अन्न खावे लागणार.
आजच्या आर्टिकल मध्ये इतकच. फिटनेस आणि Wellness बद्दल अशीच मराठी मधून माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला असेच Visit करत राहा. तुम्हाला काही शंका, प्रश्न,अभिप्राय असतील तर आम्हाला नक्की कळवा.