सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. तरीही काही लोक वेळेची काटकसर करून दवाखान्यामध्ये जातात खरे पण चाचण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे वेळच नसतो. कॅन्सर हा एक असा रोग आहे ज्यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू झाला आहे. कॅन्सर जर आवाक्यात असेल तर पेशंट बरा होऊ शकतो, परंतु पेशंट ला जर त्याच्या शरीरातील या रोगाची काही कल्पनाच नसेल तर.? आपल्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी कशाप्रकारे डिटेक्ट करणार यावर मुंबई मधील IIT यांच्यामार्फत नवीन संशोधन करण्यात आलेले आहे.

मुंबई IIT मधील रसायनशास्त्र चे प्राध्यापक चंद्रमाऊली सुब्रमण्यम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. यांचे हे संशोधन आपल्या श्वासामधून बाहेर पडणाऱ्या बारीक इंफेक्टेड पार्टसची तपासणी करून कॅन्सरचे निदान लावू शकते.

अशा बारीक कणांना एका नॅनो पार्टिकल असलेल्या मिक्श्चर मध्ये मिक्स करून विरघळवून रमण स्पेक्ट्रोस्कोपी द्वारे हि प्रक्रिया केली जाते. यामुळे काही मिनिटांमध्येच कॅन्सरचे निदान लागू शकणार आहे.

‘कॅन्सर चे निदान पहिल्या स्टेज मधेच समजल्यावर पेशंट आपले उपचार लवकरात लवकर करू शकेल आणि त्याचे बचावण्याचे चान्सेस वाढतात.’, असे प्रा. सी. सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.

या तंत्रज्ञानाचा उपयोग रुग्णालयांमध्ये करून कमीत कमी खर्चामध्ये हि सुविधा सर्व पेशंट पर्यंत कशी पोहचवता येईल याचे प्रयत्न चालू आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here