तामिळनाडू येथील भाजपाच्या प्रदेशाध्यक्षिका तमिलिसाई सौंदराजन यांनी पंतप्रधान मोदी यांच नाव 2019 च्या नोबेल शांती पुरस्कारासाठी निर्देशित केलं आहे. तसेच त्यांचे पती ‘डॉ पी सौंदराजन’ जे की एका खाजगी विद्यापीठात प्रोफेसर असून ते विभाग प्रमुख आणि जेष्ठ संवादक आहेत त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या नावाची नॉमिनेशन फाईल केली आहे. प्रदेशाच्या भाजप मुख्य कार्यालयाच्या प्रेस रिलीज मध्ये ही गोष्ट सांगण्यात आली आहे.

त्या प्रेस रिलीज मध्ये,

” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातली सगळ्यात मोठी आरोग्य सुरक्षा योजना भारतात राबवल्याबद्दल, त्यांना 2019 च्या नोबेल शांती पुरस्कारासाठी तमिलिसाई सौंदराजन यांच्या तर्फे नामांकित करण्यात आले आहेत “,

असे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मार्ग मोडीत काढणाऱ्या कामाबद्दल त्यांचं जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे. ते एक दूरदृष्टी राखून निर्णय घेणारे पंतप्रधान आहेत, असं त्यांच्या कामावरून दिसत आहे.

2019 च्या नोबेल शांती पुरस्कारासाठी नॉमिनेशन फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी आहे, दर वर्षी नॉमिनेशन प्रोसेस सप्टेंबर महिन्यात चालू होते. देशाच्या संसदेतील सदस्य, देशातील राज्याच्या विधानसभेतील सदस्य आणि अन्य लोक नरेंद्र मोदी यांच्यासाठी 31 जानेवारीपर्यंत नॉमिनेशन फाईल करू शकता, असे प्रेस रिलीज मध्ये सांगण्यात आले आहे.

” मोदींनी राबवण्यास सुरु केलेली प्रधानमंत्री जण आरोग्य योजना म्हणजेच ‘आयुष्यमान भारत‘ ही योजना भारतातील आरोग्य विकास क्षेत्रात गेम चेंजर ठरेल. ही जगातली सर्वात मोठी सरकारी योजना आहे,” असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन  चे अध्यक्ष टेड्रो यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण सुद्धा ३१ जानेवारी पर्यंत नामांकित करू शकता असे प्रेस रिलीज मधून स्पष्ठ करण्यात आले.