तरुणांमध्येच नाही तर नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांमध्येही आढळून येते. आपणही कधी ना कधी या कोंड्याच्या अनुभवातून गेलेलो असतो. कोंडा म्हणजे डोक्यावरील मृत त्वचा. हामोर्न्समधील बदल, अस्वच्छता आणि फंगल इन्फेक्शनमुळे केसात कोंडा होतो. तीन-चार दिवस केस न धुतल्यास मृत त्वचा एकत्र होते आणि अस्वच्छतेमुळे खाजही उठते. फंगसची वाढ झाल्यास सेबोऱ्हेइक डरमॅटिटिज हा त्वचा रोग होतो. त्यामुळे डोक्यावरील त्वचा, भुवया, मिशा, दाढी, कानाच्या मागे या भागात कोंडा दिसू लागतो. काहीवेळा चुकीचे शॅम्पू वापरल्यामुळे डोक्यावरील त्वचा कोरडी होते आणि कोंड्याचे प्रमाण वाढते. तेलकट त्वचा आणि डोक्यावरील त्वचा तेलकट असणाऱ्या तरुणांना पिंपल्सचा त्रास अधिक जाणवतो. केसातील कोंडा तेलकट त्वचेवर पडल्यामुळे कोंडा या त्वचेवर चिकटतो. त्यामुळेही पिंपल्सचे प्रमाण वाढते.

  • होणाऱ्या कोंड्यासाठी घरगुती उपाय:
  1.  दही आणि लिंबू: केसांच्या लांबीप्रमाणे एका बाऊलमध्ये दही घ्यावे त्यामध्ये अख्या एक लिंबाचा रस पिळावा आणि ते मिश्रण मिक्स करून घ्यावे आणि आपल्या केसांच्या मुळांना लावावे. अर्ध्या तासानंतर हर्बल शांपूने आपले केस स्वच्छ धुवून घ्यावे ही कृती आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावी.
  2. लिंबाचा रस– लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी ऑक्सिंडटस असतात ज्यामुळे केस चमकदार आणि घनदाट होतात. जर कोड्यांची समस्या असेल गरम तेलात लिंबूचा रस टाकून केसांना मालीश करा यामुळे फायदा होईल.
  3. मेथी– मेथीमध्ये निकोटॅनिक अॅसिड आणि प्रोटीन असते. दोन चमचे मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर बारीक वाटून याचा लेप केसांना लावा. ३० मिनिटे राहु द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. कोंड्याची समस्या कमी होईल.
  4. आवळा– स्वस्थ केसांसाठी कॅरोटीनची गरज असते. केसांच्या पोषणासाठी तुम्ही आवळा तेलाचा वापर करु शकता. अथवा तुळ आणि आवळ्याच्या पावडरचा लेप केसांना लावा. कोंड्यावर हा प्रभावी उपाय आहे.
  5. तेल मालिश– केसांना चांगले पोषण मिळावे यासाठी आठवड्यातून एकदा तरी तेल मालिश करावे. यामुळे केसांच्या मुळांपाशी रक्ताभिसरण सुधारते.
  6. दही आणि काळी मिरी– केसात कोंडा झाल्यास दह्यामध्ये काळी मिरी वाटून त्याचे मिश्रण लावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करा. यामुळे केसातील कोंडा नष्ट होईलच त्यासोबत केस काळे, घनदाट होतील.

हे साधे सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा आणि कोंड्यापासून सुटका मिळवा…